Maratha Reservation: 'कायद्यात बसत नसेल तर स्पष्ट सांगा, खेळ करू नका', मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची रोखठोक प्रतिक्रिया

Sambhaji Raje Chhatrapati On Maratha Reservation: 'कायद्यात बसत नसेल तर स्पष्ट सांगा, खेळ करू नका', मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची रोखठोक प्रतिक्रिया
Sambhaji Raje Chhatrapati On Maratha Reservation
Sambhaji Raje Chhatrapati On Maratha ReservationSaam Tv
Published On

Sambhaji Raje Chhatrapati On Maratha Reservation:

''सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र देणं कायदेशीरदृष्ट्या बसत असेल, तर सरकारने ते द्यावे. पण हे शक्य नसेल तर सरकारने तसं स्पष्ट सांगावं. खेळ करू नये'', असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. याच बैठकीत आपलं मत मांडल्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''सर्वपक्षीय बैठकीला मला आमंत्रित बोलवलं होतं. माझा मुद्दा मांडून मी निघालो आहे. छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं होतं. 15-20 वर्षापासून मी गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मागणी करत आहे. जरांगे पाटील यांना सरकार दरवेळी आश्वासन देतं, पुढे काही होत नाही. लाठीचार्ज झाल्याने वातावरण बदललं. लाठीचार्जआधी ही चर्चा व्हायला हवी होती.''

Sambhaji Raje Chhatrapati On Maratha Reservation
Aditya Thackeray News: 'अद्यापही उत्तर मिळालं नाही', स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचं पुन्हा पालिका आयुक्तांना पत्र

संभाजीराजे म्हणाले, न्यायिक पद्धतीने जर सरसकट बसत असेल तर सरकारने द्यायला पाहिजे. पण केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी जीआर काढणार असाल आणि कायदेशीर टिकणार नसेल तर चालणार नाही.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले की, ''2021 ला न्यायालयाने आरक्षण रद्द केलं. त्यावेळी पासून मी पत्र लिहित आहे. पहिलं पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही पाठवलं. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजातील लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची काय चर्चा झाली माहिती नाही.''

Sambhaji Raje Chhatrapati On Maratha Reservation
India Alliance News: इंडिया आघाडीत जागावाटप आणि उमेदवार कधी होणार निश्चित? लालूंनी सांगितली तारीख, दिल्लीत होणार बैठक

संभाजीराजे पुढे म्हणाले, ''सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. सरकारने याची काळजी घ्यावी. सरकारला मी सांगत होतो, त्यांनी काही केलं नाही. ही सर्वपक्षीय बैठक आधी का घेतली नाही.'' मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करायला पाहीजे हे मी सरकारला सांगितलं, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com