Maratha Aarakshan Morcha: मराठा आरक्षणावर सरकारचे मोठे संकेत; मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर

Devendra Fadnavis On Manoj Jarange: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केले आहे. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. सरकार मराठा समाजाच्या पाठिशी आहे, असे ते म्हणाले.
Maratha Aarakshan Morcha: मराठा आरक्षणावर सरकारचे मोठे संकेत; मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर
Devendra Fadnavis On Manoj Jarangex
Published On

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने आले आहे. या आंदोलनाचा फटका मुंबईला बसला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाबाबत आमच्या मनात काहीच शंका नाही. आम्ही या समाजाच्या पाठीशी आहोत.' , असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'आज सकाळी आंदोलक मुंबईत आले. मनोज जरांगे उपोषणला बसले. पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलनकांनी सहकार्य केले आणि वाहना काढून जागा मोकळ्या केल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं आल्यानंतर वाहतूक कोंडी होतेच. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या सगळ्यामध्ये एका गोष्टीची खबरदारी घ्यावी लागेल. काही लोकच वेगळ्या पद्धतीने वागतात त्यामुळे संपूर्ण आंदोलानाला गालबोट लागते. त्यामुळे कुणी असे वागू नये याकडे लक्ष द्यावेत. मनोज जरंगे पाटील यांनी देखील अशाच पद्धतीने आवाहन केले आहे की कुणीही असं वागू नये.'

Maratha Aarakshan Morcha: मराठा आरक्षणावर सरकारचे मोठे संकेत; मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर
Manoj Jarange: सरकारने गोळ्या झाडल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे भडकले|VIDEO

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, 'जरांगेंनी पुन्हा आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जी काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिस त्यांना सहकर्य करतील. प्रशासन आणि आंदोलनकर्ते योग्य निर्णय घेतली. प्रशासन सकारात्मक विचार करेल. शेवटी या आंदोलनात त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात जो मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी एक समिती आहे. या समितीला आधी आलेल्या मागण्यावर ते विचार करत आहेत. कायदेशीर मार्ग काढावे लागतील. नुसते आश्वासन देऊन चालणार नाही.

Maratha Aarakshan Morcha: मराठा आरक्षणावर सरकारचे मोठे संकेत; मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर
Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

सरकार मराठा समाजाच्या पाठिशी आहे असं म्हणत फडणवीसांनी सांगितले की, 'महायुतीच्या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. इतर काळात त्यांना न्याय मिळाला नाही. आरक्षणाचे, सारथीचे कामही आम्हीच करून दिले आहे. विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याचे कामही आम्हीच केले आहेत. शिक्षणाच्या, रोजगाराच्या गोष्टी आमच्या सरकारच्या काळात केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समजाजबद्दल आमच्या मनात काही शंका नाही. आम्ही समाजाच्या पाठिशी आहोत. पण काही लोकं जाणिवपूर्वक २ समाजात वाद पेटवण्याचे काम करत आहेत. पण आम्ही तसे नाही आहोत. आम्ही योग्य मार्ग काढू.'

Maratha Aarakshan Morcha: मराठा आरक्षणावर सरकारचे मोठे संकेत; मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर
Manoj Jarange Biography : शिक्षण सोडलं, हॉटेलवर काम केलं, सामान्य कार्यकर्ता झाला मराठ्यांचा सरदार, मनोज जरांगेंचा धगधगता प्रवास

आरक्षणाबाबत शिंदे समितीचे काम सुरू असल्याचे म्हणत फडणवीसांनी सांगितले की, 'आपण यासाठी शिंदे समिती तयार केली आहे. ही समिती त्यांच्या मागण्यांवर विचार करत आहे. त्यानंतर चर्चा देखील करेल. जी चर्चा त्याठिकाणी आवश्यक आहे त्यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल. यापूर्वीही चर्चा एकप्रकारे कमिटीने सुरू केली आहे. मागण्यांवर कमिटीची बैठक देखील झाली आहे. आजही मराठा समाजाला आरक्षण आहे. आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे. आम्हाला सर्व समाज सांभाळायचे आहेत. आम्ही निवडून आलो कारण सर्व समाजाने आम्हाला मतदान केले आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना सांभाळून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत.'

Maratha Aarakshan Morcha: मराठा आरक्षणावर सरकारचे मोठे संकेत; मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर
Manoj Jarange Patil: वाहनांच्या लांबच लांब रांगा अन् भगवे झेंडे; मुंबईत मराठ्याचं वादळं धडाडलं, पाहा Photo

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com