Maratha Protest: गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, हायकोर्टाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलक आक्रमक

Maratha Aarakshan Protest: मुंबई खाली करण्याच्या हायकोर्टाच्या आदेशानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. 'आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. गोळ्या घातल्या तरी इथून हटणार नाही.', अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
Maratha Protest: गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, हायकोर्टाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलक आक्रमक
Maratha Aarakshan ProtestSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.

  • हायकोर्टाने आंदोलकांना ३ वाजेपर्यंत मैदान रिकामे करण्याचा आदेश दिले.

  • आंदोलकांनी 'गोळ्या घातल्या तरी हटणार नाही' अशी ठाम भूमिका घेतली.

  • सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. या आंदोलनासंदर्भात आज मुंबई हायकोर्टाने महत्वाचे आदेश दिले आहेत. ३ वाजण्याच्या आत आझाद मैदान खाली करण्याचे आदेश कोर्टाने आंदोलकांना दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी आंदोलकांना मुंबई सोडण्याची विनंती केली. यावरून आता आंदोलक आणखी आक्रमक झाले आहेत. गोळ्या घातल्या तरी आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी मुंबईत लोकल आणि वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला. सीएसएमटी रेल्वेस्थानक आणि परिसरामध्ये गोंधळ घातला. आझाद मैदान आणि सीएसएमटी स्टेशन परिसरात आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली आहे. अशामध्ये आज मुंबई हायकोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने मुंबईमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Maratha Protest: गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, हायकोर्टाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलक आक्रमक
Maratha Reservation : मनोज जरांगे यांचं मुंबईत उपोषण; बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सरकारला कडक आदेश दिले. दुपारी ३ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, सर्व सुरळीत झालं पाहिजे, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई केली जाईल, असे थेट आदेश हायकोर्टाने दिले आहेत. राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी असे देखील हायकोर्टाने सांगितले. हायकोर्टाच्या या आदेशानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही हटणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले.

Maratha Protest: गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, हायकोर्टाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलक आक्रमक
Maratha Reservation: मुंबई पोलिसांचा अल्टिमेटम; ३ वाजेपर्यंत शहर रिकामं करा; मराठा आंदोलकांचा आक्रोश | VIDEO

हायकोर्टाने सुनावणीदरम्यान, ३ वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा असे आदेश राज्य सरकारसोबत आंदोलकांना देखील दिले. सरकारच्या भूमिकेवर सुंतुष्ट नाही. मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही. आंदोलकांकडे परवानगी नाही तर त्यांनी तात्काळ आझाद मैदान खाली करावं. ते आझाद मैदानात जागा अडवू शकत नाहीत. ३ वाजेपर्यंत कारवाई झाली नाही तर कोर्ट रस्त्यावर उतरून आढावा घेईल, असे हायकोर्टाने राज्य सरकारला खडसावून सांगितले. त्यामुळे आता राज्य सरकार आणि पोलिसांपुढे मराठा आंदोलकांना मुंबईतून हटवण्याचे मोठे आव्हान आहे.

Maratha Protest: गोळ्या घातल्या तरी हटणार नाही, हायकोर्टाच्या आदेशानंतरही मराठा आंदोलक आक्रमक
Maratha Reservation : मराठा आंदोलन हाताळण्याबाबत कोर्टाचे महत्वाचे आदेश; सरकारची कसोटी लागणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com