Manoj Jarange Patil : ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा कुणाला? VIDEO

Manoj Jarange Patil Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सोडलं आहे. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
 ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा कुणाला?
Manoj Jarange Patil :Saam tv
Published On

जालना : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उचलून धरला आहे. मनोज जरांगे गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर आज बुधवारी जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा मराठा आरक्षणासाठी अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी उपोषणाला बसले होते. आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता. गेल्या दोन दिवसांपासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. मध्यरात्री डॉक्टर आणि समर्थकांच्या विनंतीनंतर जरांगेंनी सलाईन लावली.

 ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा कुणाला?
Akshay Shinde Case: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांचे पाय खोलात, कोर्टाने झाप झाप झापलं; सुनावणीत काय घडलं?

आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उपोषण सोडण्याची घोषणा केली. सलाइन लावून उपोषण करण्यात काय अर्थ आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

'आज प्रत्येक क्षेत्रातील मराठा आरक्षणाची वाट पाहू लागला आहे. देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की, आमचा गरीब मराठा बांधव आरक्षणाची वाट पाहतोय. मी राजकीय भाषा बोलणार नाही. आचारसंहितेपर्यंत आरक्षण न दिल्यास कोणालाही सोडणार नाही. माझी भूमिका माझ्यासाठी नसून समाजासाठी आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

'सरकारनं मराठा समाजाच्या धोका केला तर पुन्हा पुन्हा त्यांना मतदान करून मोठं करू नका. मराठा समाजाच्या पोरांचं वाटोळं करू नका. मराठ्यांनो आता भोळे राहू नका. माझं शरीर पूर्ण संपलं आहे. मला चार-पाच दिवसांच्या आरामाची गरज असून तुम्ही रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये येऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com