Maratha Reservation Protest: मराठा आंदोलन तापलं! बीडहून जालना, संभाजीनगरला जाणाऱ्या बस सेवा बंद; पाहा VIDEO

Beed News : वडीगोद्री येथे मराठा आंदोलकांनी आक्रमक होत धुळे -सोलापूर महामार्ग आडवला होता. यामुळे एसटीच्या बीड विभागाने जालना, संभाजीनगर मार्गे जाणाऱ्या सर्व बस बंद केल्या आहेत.

मराठा आंदोलकांनी वडीगोद्री येथे रस्ता रोको सुरू केल्याने, जालना संभाजीनगर, धुळे, जळगाव, बुलढाणा, खामगाव यासह जालना मार्गे आणि संभाजीनगर मार्गे जाणाऱ्या सर्वच बस एसटी महामंडळाच्या बीड विभागाने बंद केल्या होत्या. एकही बस गेल्या एक तासांपासून जालना रोड मार्गे धावली नाही. यामुळे बीड बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं पाहायला मिळालं.

तब्बल एक तासांपेक्षा अधिक वेळ, या एसटी बस बीड बस स्थानकामध्ये थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या एसटी बस सुरू करण्यात आल्या असून बंद एसटीत बसलेल्या प्रवाशांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. पुन्हा एकदा एसटी बस या जालना रोड मार्गे मार्गस्थ झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com