राज्यात मराठा आरक्षणासाठी झंझावाती आंदोलन करुन नावारुपाला आलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसलेत. उपोषण, रॅली, आंदोलन करुन सरकार दाद देत नसल्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे आक्रमक झालेत.
गेल्या सहा महिन्यांपासून जरांगे फडणवीस आणि भुजबळांना टार्गेट करीत आहेत. त्यातून मराठा-ओबीसी अशी दरी निर्माण झाली आहे. पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्यावर जरांगेंनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा नाहीतर 2024 ला राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल, अशा शब्दात फडणवीसांना पुन्हा एकदा इशारा दिला.
सरकार धनगर, मुस्लिमांसह शेतकऱ्यांना वेड्यात काढतंय.,उपसरपंच सगळं करतोय, असं म्हणत जरांगेंनी (Manoj Jarange Patil) फडणवीसांवर संताप व्यक्त केलाय. सत्ताधारी मात्र सावध भूमिका घेतायेत.
फडणवीस (Devendra Fadnavis) मुत्सदी नेते आहेत. अंगावर आलेला आरक्षणाचा चेंडू ते कसे टोलवणार हे पाहणं महत्वाचं आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत आरक्षण फॅक्टरने महायुतीची गाडी पंक्चर केली होती.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर जरांगेंनी उपोषणाचा डाव टाकलाय. त्यांना किती यश येणार आणि कुणाचं राजकीय समीकरण बिघडणार याबाबत महाराष्ट्राला (maharashtra politics) उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.