
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला.
मराठा आरक्षण आंदोलनात तिसऱ्या मृत्यूची घटना समोर आली.
मुख्यमंत्रीच हुल्लडबाज आहेत अशी टीका मनोज जरांगे यांनी केली
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमच्यातला तिसरा खून झाला.', अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आमची पोरं हुल्लडबाज नाही तर मुख्यमंत्री हुल्लडबाज असल्याचे देखील म्हटले आहे.
मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की, 'रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारला. त्याचे बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून झाला आहे आमचा आतापर्यंत. देवेंद्र फडणीस यांच्या आईला बोलल्यावरती त्यांना राग येतो. आज आमच्या एका आईचं लेकरू गेलं. आईच्या कुशीत खेळणारं आमचं सोन्यासारखं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं. याची लाज तुम्हाला वाटू दे.'
यावेळी जरांगेंनी पुन्हा फडणवीसांच्या आईबद्दल वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'देवेंद्र फडणीस यांच्या आईला आमचं एक सांगणं आहे. देवेंद्र फडणवीस जसं तुमचं लेकरू आहे तसं आमच्याही आईचं लेकरू देवेंद्र फडणवीसांनी काल हिरावून घेतलं. तुमच्या लेकराबद्दल जसं तुम्ही बोलता तसं आमच्या लेकराबद्दलही बोलावं तेवढीच अपेक्षा आहे. गरिबचं लेकरू पायपीठ करत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या दारात आले होते. पण तुमच्या मुलाने त्याचा खून केला. त्याला न्याय दिला नाही. तो अटॅक येऊन मेला. मेला म्हणजे त्याला खूनच म्हटलं जातं. '
मनोज जरांगे पाटील यांनी सराकारवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, 'पोरं हुल्लडबाजी करत नाहीत तर सरकार हुल्लडबाजी करत आहे. सरकारला ४ महिन्यापूर्वी सांगितले होते. आम्हाला मुंबईत यायाचे नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा. पण या हुल्लडबाज आणि माजलेल्या मुख्यमंत्र्याने जाणूनबुजून प्रश्न सोडवला नाही. कुणाचेही ऐकले नाही. मनमानी करणारा आणि अपुऱ्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळे महाराष्ट्रात असे होत आहे. कायदा सोडून आम्ही कुठेही काहीही केले नाही. सरकारचा नाईलाज आहे तर आमचाही नाईलाज आहे. '
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.