Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे तर मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आमची पोरं नव्हे मुख्यमंत्री हुल्लडबाज, असं विधान त्यांनी केले आहे.
Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे तर मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil On Cm Devendra FadnavisSaam Tv
Published On

Summary -

  • मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना हुल्लडबाज म्हटले.

  • जरांगे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

  • सरकारने जाणूनबुजून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, अशी टीका.

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'आमची पोरं हुल्लडबाज नाही तर मुख्यमंत्री हुल्लडबाज आहेत', अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून ते ठिकठिकाणी वाहनं अडवत आहेत, सीएसएमटी रेल्वे स्थानकावर त्यांनी लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन करत असताना सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, 'गोंधळ करू नका. वाट बघा सगळ्यांना माझी विनंती आहे. तुम्हाला माझी शेवटची विनंती आहे सर्वांनी शांत राहा. पोरं हुल्लडबाजी करत नाहीत तर सरकार हुल्लडबाजी करत आहे. सरकारला ४ महिन्यापूर्वी सांगितले होतं. आम्हाला मुंबईत यायाचे नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा. पण या हुल्लडबाज आणि माजलेल्या मुख्यमंत्र्याने जाणूनबुजून प्रश्न सोडवला नाही. कुणाचेही ऐकले नाही. मनमानी करणारा, अपुऱ्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळे महाराष्ट्रात असे होत आहे.'

Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे तर मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
ManoJ Jarange Patil : एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगेंची आंदोलकांना साद

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जरांगे म्हणाले की, 'हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं नेहमी मराठ्यांना हिनवतो. मराठ्यांना छेडतो आणि अपमान करतो. त्याला ४ महिन्यापूर्वी सांगितले होते आम्हाला मुंबईत यायचे नाही आरक्षण देऊन टाका. हुल्लडबाज आंदोलक नाहीत तर सरकार आहे. पोरांचे काय हाल चालले आहेत कुणाला माहिती नाहीत का? पोरांचे म्हणणं समजून घ्या. सरकारने जेवण बंद केलं. आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या आडवल्या. कायदा सोडून आम्ही कुठेही काहीही केले नाही. सरकारचा नाईलाज आहे तर आमचाही नाईलाज आहे.'

Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे तर मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
ManoJ Jarange Patil : एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगेंची आंदोलकांना साद

तसंच, 'आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. मला बोलायला सुद्धा लावायला नाही पाहिजे तुम्ही. तुम्ही मनानेच गाड्या अडवल्या नाही पाहिजे. रस्त्यावर उभं राहिले नाही पाहिजे. माझं तोंड सुखायला लागले आहे. माझ्या शरिरातून तोंडावाटे पाणी बाहेर यायला लागले आहे. मी सतत थुंकत आहे. त्यामुळे माझी आंदोलकांना विनंती आहे. सीएसएमटी स्टेशनवर जाऊ नका शांतपणे आझाद मैदानावर येऊन बसा. ', असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केले आहे.

Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे तर मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे तर मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com