
१९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ५१.५० रुपयांनी स्वस्त झाला.
दिल्लीमध्ये नवी किंमत १५८० रुपये, मुंबईत १५३१.५० रुपये.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे आहेत.
हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिकांना या किंमत घटेचा मोठा फायदा.
LPG Cylinder Price Cut : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईपासून दिलासा मिळाला आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्ली ते मुंबईपर्यंत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आजपासून १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडेरची किंमत ५१.५० रूपयांनी स्वस्त झाली आहे. घरगुती १४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
व्यावसायिक सिलिंडरची किंमत ५१.५० रूपयांनी स्वस्त झाली आहे, आजपासून नवे दर लागू करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमत १५८० रूपये इतकी झाली आहे. याआधी ऑगस्टमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली होती. दरम्यान, घरगुती १४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती स्थिर आहेत, गेल्या काही महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नाही.
आयओसीएलच्या संकेतस्थळानुसार, एक सप्टेंबरपासून राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाचा गॅस सिलिंडरची किंमत १५८० रूपये इतकी झाली आहे. कोलकातामध्ये हा सिलिंडर १३३४.५० रूपयांना मिळेल. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १९ किलो वजनाचा गॅस सिलिंडर १५८२.५० रूपयांवरून १५३१.५० रूपये इतकी किंमत झाली आहे. चेन्नईमध्ये हा गॅस १७३८ रूपयांना मिळेल. १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाल्याचा फायदा हॉटेल, रेस्टारंट, ढाबा आणि अन्य व्यावसायिकांना होणार आहे.
मागील काही दिवसांपासून १९ किलो वजनाचा व्यावसाकिय गॅसच्या किंमतीत सातत्याने घट पाहायला मिलत आहे. याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑईल मार्केटिंग कंपन्यानी गॅसच्या किंमतीत ३३.५० रूपयांनी कपात केली होती. तर १ जुलै रोजी सिलिंडरची किंमत ५८ रूपयांनी कपात केली होती. दरम्यान, ऑईल कंपन्याकडून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरच्या नव्या किंमती ठरवल्या जातात.
व्यावसायिक गॅसच्या किंमती सातत्याने कमी होत असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मागील चार ते पाच महिन्यापासून गॅसच्या किंमती जैसे थे आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ८ एप्रिल रोजी बदल करण्यात आला होता, त्यानंतर अद्याप कोणताही बदल झालेला नाही. १४ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर मुंबईमध्ये ८५२.५० रूपयांना मिळतोय. तर दिल्लीमध्ये ८५३, चेन्नई ८६८ आणि कोलकाता ८७९ रूपयांनी मिळतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.