मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, मंत्री शिरसाट यांनी दिली माहिती

सरकारने मराठा समाजासाठी वंशावळ समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढवला आहे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी. सामाजिक न्याय विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार समितीला मुदतवाढ दिल्याची माहिती त्यांनी दिली.
संजय शिरसाट
Sanjay Shirsat Saam Tv
Published On
Summary
  • मराठा आरक्षणासाठी गठीत वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला.

  • आता ही समिती ३० जून २०२६ पर्यंत काम करणार आहे.

  • समिती पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देणार आहे.

  • मंत्री संजय शिरसाट यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.

आरक्षणासाठी मराठ्यांचे वादळ मुंबईमध्ये धडकले. दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून जाणार नसल्याची भूमिका मराठ्यांनी घेतली आहे. आरक्षणासाठी मराठे आक्रमक झाले असताना राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

संजय शिरसाट
मुंबईचे वातावरण तापलं, BMC समोर मोठा गोंधळ, मराठा आंदोलक अन् पोलिसांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता.

संजय शिरसाट
Cardiac Arrest : धक्कादायक! कार्डिअॅक सर्जनचा कार्डियक अरेस्टने मृत्यू, रूग्णालयातच अचानक डॉक्टर कोसळले

यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

संजय शिरसाट
Maratha Aarakshan : महायुतीच्या मंत्र्याचा जरांगेंना जाहीर पाठिंबा, म्हणाले आरक्षण मिळालेच पाहिजे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com