

सोशल मीडियाच्या माध्यामातून तरुणींशी ओळख करून त्यांना लग्नाचं आमीष देऊन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या एका डॉक्टराला मालवणी पोलिसांनी अटक केलीय. योगेश सुनील भानुशाली (३३ वय), अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. एका पीडितेच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. या आरोपीविरोधात तीन अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Latest News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी ओळख करायचा. त्यांच्याशी मैत्रीकरुन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असायचा. त्यांना लग्नाचं आमीष द्यायचा. मुली आपल्या जाळ्यात अडकल्याचं जेव्हा त्याला खात्री होत असायची तेव्हा तो त्या मुलींशी शारीरिक संबंध ठेवायचा. त्यानंतर तो त्यांचे व्हिडिओ फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा. ब्लॅकमेल करत त्या मुलींकडून तो दागिने उकळत असायचा.
मालवणी पोलिसांकडे जेव्हा एका पीडितेनं या डॉक्टरची तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी या डॉक्टरला अटक केलीय. पीडितेच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर धक्कादायक प्रकरण समोर आलं. आरोपी डॉक्टरनं पीडितेशी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरुन मैत्री केली. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा तिचा छळ केला. आधी पीडितेला लग्नाचं आमीष दिलं त्यानंतर लग्नास नकार दिला. अशाप्रकारे फसवणुकीचे आणि बलात्काराचे एक नव्हे तर तब्बल ३ गुन्हे आरोपीविरोधात दाखल करण्यात आलेत.
पोटच्या मुलींवर अत्याचार
मुंबईत अजून एक अत्याचाराची घटना आज घडली. या घटनेत जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलींवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापांना अटक केलीय. ही घटना जोगेश्वरी पश्चिम येथे घडलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथे राहणाऱ्या एका नराधम बापाने जीवे मारण्याची धमकी देत आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.