Rajkot Fort Rada: राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? राणे, ठाकरे समर्थकांमध्ये हाणामारी का झाली?

Malvan Fort Rane Thackeray Controversy: मालवणमध्ये ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांचा (Rane Vs Thackeray ) तुफान राडा झाला. राजकोट किल्ल्यावर नारायण राणे आणि आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबजी झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली.
मालवणमध्ये ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? वाचा
Malvan Fort Rada :Saam tv
Published On

Rajkot Shivaji Maharaj Statue Collapse : मुंबई : सिंधुदुर्गच्या मालवणातील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort rada) छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकारण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते उद्धाघाटन करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्योराप सुरु झाले आहेत. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने मोर्च्याचं आयोजन केलंय. या राजकोट किल्ल्यावरील नियोजित पाहणीसाठी आदित्य ठाकरे आले होते. तर या ठिकाणी निलेश राणे देखील आले होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीनंतर हाणामारी झाल्याचे दिसून आले. यावेळी राणे आणि ठाकरेंच्या (Rane Vs Thackeray ) महिला कार्यकर्त्या देखील एकमेकांना भिडल्या.

राणे-ठाकरे आमनेसामने

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (rajkot shivaji maharaj statue collapse) कोसळल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज मालवन बंदचे आवाहन करण्यात आले होते. आज आदित्य ठाकरे घटनास्थळाच्या पाहणीसाठी राजकोटवर आले. तर दुसरीकडे नारायण राणे यांच्यासह निलेश राणे आणि त्यांचे समर्थक देखील आले होते. या पाहणीदरम्यान दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले.

मालवणमध्ये ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? वाचा
Rajkot Fort: मालवणमध्ये राडा, आधी घोषणाबाजी मग हाणामारी; ठाकरे- राणेंसमोरच कार्यकर्ते भिडले, पाहा VIDEO

कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

दोन्ही नेते एकमेकांसमोर आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीनंतर जोरदार हाणामारी झाली. या कार्यकर्त्यांच्या हाणामारीमध्ये पोलिसांना उतरावं लागलं. पोलिसांनी हाणामारी थांबवण्याचे प्रयत्न केले. यावेळी आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना थांबण्याचं आवाहन केलं. तर यावेळी राणेंच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलं. महाविकास आघाडीने मालवणचा भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढणार आहे. या मोर्च्यासाठी महाविकास आघाडीतील दुसऱ्या फळीतील प्रमुख नेते घटनास्थळी हजर झाले आहेत. तर या मोर्च्याचा आधी आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ला येथे पाहणीसाठी आले होते. त्यावेळीच कार्यकर्त्यांचा राडा झाला.

मालवणमध्ये ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं? वाचा
Rajkot Fort Rada : राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले? पाहा VIDEO

नेमकं काय घडलं?

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर भाजप खासदार नारायण राणे, निलेश राणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पाहणीसाठी आले होते. या घटनास्थळी पाहणीकरून नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते परत निघाले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते तिथे दाखल झाले. यावेळी आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

नारायण राणे काय म्हणाले ?

दोन्ही कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नारायण राणे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. 'बाहेरील लोक दादागिरी करत असीतल. त्यांना पोलीस संरक्षण देत असतील. तर आम्ही या येथून हलणार नाही. काय करायचं का, वाटल्यास गोळ्या घाला. पण आम्ही येथून हलणार नाही. असे आंडे पांडू आयुष्यभर पाहिले आहेत. आम्ही येथून जाणार नाहीत, असे नारायण राणे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com