घायवळ गँगला मोठा हादरा; कुख्यात गुंड घायवळच्या भावाला अटक, राजस्थानमधून मुसक्या आवळल्या

sachin ghaiwal : घायवळ गँगला मोठा हादरा बसला आहे. कुख्यात गुंड सचिन घायवळला अटक करण्यात आली आहे.
sachin ghaiwal news
sachin ghaiwal Saam tv
Published On
Summary

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

गुंड सचिन घायवळला राजस्थानमधून अटक

सचिनला अटक केल्याने घायवळ गँगला हादरा

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील घायवळ गँगला मोठा हादरा बसला आहे. गुंड सचिन घायवळ याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे. सचिनला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. सचिनला अटक केल्याने पुण्यातील गुंडांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे कर्मचारी राजस्थानमध्ये गुंड सचिन घायवळच्या मागावर होते. सचिन हा गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. त्याच्या विरोधात हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकी यांसारखे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. सचिन हा गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याला राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

sachin ghaiwal news
Shocking: पैशांच्या हव्यासापोटी आईनेच केली पोटच्या दोन मुलांची विक्री, तिघांना अटक; प्रियकर फरार

सचिन घायवळच्या विरोधात ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याने कर्वेनगर, शिवणे भागातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ , वाहतूक सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीच्या संचालक महिलेकडून खंडणी उकळली होती.

या प्रकरणी खासगी कंपनीच्या ४० वर्षीय संचालक महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. महिलेने बापू कदम, निलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, संदीप फाटक इत्यादी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सचिन घायवळवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये ( मकोका ) अंतर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून गुंड सचिन घायवळ फरार झाला होता.

sachin ghaiwal news
Shocking: पैशांच्या हव्यासापोटी आईनेच केली पोटच्या दोन मुलांची विक्री, तिघांना अटक; प्रियकर फरार

मागील काही महिन्यांपासून पोलीस हे सचिन घायवळच्या मागावर होते. त्यानंतर आज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सचिन घायवळला अटक केली आहे. तर त्याचा भाऊ गुंड निलेश घायवळ अद्याप फरार आहे. निलेश घायवळ हा देशाबाहेर पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com