आज कोणत्या कोणत्या नेत्यांच्या  बॅगा तपासल्या? अधिकाऱ्यांच्या झडतीवरून कोण काय म्हणाले?
Maharashtra Election Saam tv

Maharashtra Election : आज कोणत्या कोणत्या नेत्यांच्या बॅगा तपासल्या? अधिकाऱ्यांच्या झडतीवरून कोण काय म्हणाले?

maharashtra assembly election : आज निडणूक अधिकाऱ्यांनी काही नेत्यांच्या बॅगा तपासल्या. या बॅगा तपासणीवर अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचारसभांसाठी राज्य पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक बडे नेते हेलिकॉप्टर आणि कारने विविध मतदारसंघात जात आहेत. मात्र, या मतदारसंघात हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती घेतली जात आहे. या झडतीनंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे व्हिडिओ काढले होते. तसेच इतर नेत्यांच्या बॅगा तपासा, असे आव्हान दिले होते. यावरून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या राज्यभरातील विविध भागात प्रचारसभा होत आहेत. आज दिवसभरात अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, उद्धव ठाकरे इ. नेत्यांच्या बॅगाची झडती घेण्यात आली. या बॅगा तपासणीवरून उद्धव ठाकरेंनी महायुती आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

आज कोणत्या कोणत्या नेत्यांच्या  बॅगा तपासल्या? अधिकाऱ्यांच्या झडतीवरून कोण काय म्हणाले?
Raj Thackeray: नगरसेवक असतो का? महापालिकेच्या निवडणुकांवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरेंनी बॅगा तपासणीवरून टीका केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले होते की,'निवडणूक अधिकाऱ्यांना काही कळत नाही. ज्यांच्या हातातून कधी पैसे निघाले नाहीत. त्यांच्या हातातून आणखी काय निघणार. आमच्यापण बॅगा तपासल्या आहेत. अरे ऐवढा काय तमाशा करत आहेत'.

आज कोणत्या कोणत्या नेत्यांच्या  बॅगा तपासल्या? अधिकाऱ्यांच्या झडतीवरून कोण काय म्हणाले?
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : तुम्ही पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगा चेक करतात; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

श्रीकांत शिंदेंची ठाकरेंवर टीका

खासदार श्रीकांत शिंदे टीका करताना म्हणाले, 'प्रत्येक गोष्टीचा रडारड करणे. माझा पक्ष चोरला. चिन्ह चोरलं. माझं हे चोरलं ते घेतलं. आता तर म्हणजे उच्चांकी पातळी गाठली. मुख्यमंत्री शिंदे यांचीही बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली. देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासण्यात आली. पण व्हिडिओ बनवला नाही. आपण नळावर भांडतो, रस्त्यावर भांडतो, व्हिडिओ काढतो. तसं रोज हे करत आहेत'.

आज कोणत्या कोणत्या नेत्यांच्या  बॅगा तपासल्या? अधिकाऱ्यांच्या झडतीवरून कोण काय म्हणाले?
Eknath Shinde News : पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी, म्हणाले... | VIDEO

चित्रा वाघ यांचा विरोधकांवर नेम

बॅग तपासणीवरून भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही बॅग तपासल्या जातात. त्यांनी कधी या मुद्द्याचं राजकारण केलं नाही. मात्र, उद्धव ठाकरे आणि विरोधक जाणीपूर्वक या मुद्याचे राजकारण करत आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com