Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव! नागपूरसह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update Today News : महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव सुरूच आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही विजांसह पावसाची शक्यता.
Maharashtra Weather Today:
Maharashtra Weather Today:AI Image
Published On
Summary
  • महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव

  • नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना येलो अलर्ट

  • काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

  • राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी कायम

राज्यात श्रावण सरींचा लपंडाव पाहायला मिळतो आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूर्व विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण कायम आहे. आजही आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही भागांत जोरदार सरींची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो.

Maharashtra Weather Today:
Shocking : धक्कादायक! भाजप नेत्याच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, अंतर्वस्त्रात आढळली चिठ्ठी; समोर आले कारण

तसेच मराठवाड्यातील हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Today:
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

ईशान्य उत्तर प्रदेशात सध्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मात्र, ही हवामान प्रणाली हळूहळू निवळून जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एकंदरीत, राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार असून, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com