गुजरातच्या सुरतमध्ये खळबळ
भाजप नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या
अंतर्वस्त्रांमध्ये आढळली सुसाईड नोट
पोलिसांकडून तपास सुरु
Gujarat Surat BJP Leader Daughter In Law Sucide गुजरातमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये भाजपच्या माजी महिला पदाधिकाऱ्याच्या २४ वर्षीय सुनेने आत्महत्या केली आहे. निधी सिंह असे मृत महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. २५ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह घरातील बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी निधीचा पती सौरभ सिंह (२६) आणि त्याच्या एका मैत्रिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निधी ही बिहारमधील मुजफ्फरपूरची रहिवासी होती. सुमारे २ वर्षांपूर्वी तिचे सौरभ सिंहसोबत लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर सौरभचे दुसऱ्या एका महिलेसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचा आरोप निधीच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नवऱ्याच्या बाहेरील संबंधांमुळे कंटाळलेल्या निधीने आयुष्य संपवलं. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सौरभची आई शशी सिंह घरी परतल्या. त्यावेळी त्यांना निधी बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसली. घरात त्यावेळी दुसरे कोणीही नव्हते.
शशी यांनी पती संजय सिंह आणि मुलगा सौरभला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली.निधीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिचा भाऊ आदित्य कुमार सुरतला पोहोचला. त्याने सौरभ आणि त्याच्या कथित गर्लफ्रेंड विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच्या आरोपानुसार, सौरभ आणि संबंधित महिलेचे लग्नापूर्वीपासूनच संबंध होते. लग्नानंतर निधीला याची माहिती मिळाल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढले.
कुटुंबीयांनी सौरभला हे संबंध संपवण्यास सांगितले होते, मात्र त्यानंतरही त्यांचे संबंध सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, शवविच्छेदनादरम्यान निधीच्या अंतर्वस्त्रांमध्ये सुसाईड नोट आढळल्याची माहिती समोर आली आहे. ही चिठ्ठी निधीने लपवून ठेवली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे, याचा तपास सुरू आहे. कडोदरा पोलिसांनी सौरभ आणि त्याच्या कथित गर्लफ्रेंड विरोधात तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नेमकं काय सत्य समोर येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.