Rain Alert : महाराष्ट्रावर 'अवकाळी'च संकट कायम, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Today Weather News : राज्यात अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा बदल झाला असून मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे.
Rain Alert : महाराष्ट्रावर 'अवकाळी'च संकट कायम; वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात अवकाळी पावसामुळे हवामानात बदल

  • मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी

  • वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

  • शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी

Maharashtra Today Temprature राज्यात उन्हाचा कडाका कमी झाला असून हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज देखील दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील ४ दिवस राज्यात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.

IMD च्या अंदाजानुसार, शुक्रवारी यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश तापमान नोंदले गेले. ‎‎जळगाव आणि ‎‎अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर आणि मालेगाव येथे राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Rain Alert : महाराष्ट्रावर 'अवकाळी'च संकट कायम; वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Rain Alert : पुढचे ४ दिवस महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, या जिल्ह्यांना यलो अलर्ट; कुठे, कसं असेल हवामान, वाचा

आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत राज्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Alert : महाराष्ट्रावर 'अवकाळी'च संकट कायम; वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Unsesonal Rain : अवकाळीनं बळीराजा कोलमडला, डोळ्यासमोर पिकं पाण्यात, बांधावरच शेतकऱ्याचा अश्रुचा बांध तुटला

अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत

या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट आणले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील पिंपळपाटी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः मका पिकाला मोठा फटका बसला असून शेतात उभे असलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाने आणखी संकट ओढवले आहे. “पंचनामे केव्हा होणार? नुकसान भरपाई केव्हा मिळणार? आता पुढे जगायचं कसं?” असे असंख्य प्रश्न शेतकरी प्रशासनासमोर उपस्थित करत आहेत. दरवर्षी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी उध्वस्त होत असल्याचे चित्र असून, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. सरकारने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com