Maharashtra SSC Result: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या निकालानंतर राज्यभरात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जल्लोष सुरू आहे. याचदरम्यान, ठाण्यातील एक विद्यार्थी सर्व विषयात ३५ गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. या विद्यार्थ्याची जोरदार चर्चा होत आहे. (Latest Marathi News)
दहावीच्या निकालात अगदी शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चर्चा कानावर येतात. मात्र ठाण्यातील एका पठ्ठयाने सर्वच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. त्याच्या या अनोख्या यशाचे कुटुंबीयांना कौतुकच आहे. आमच्या मुलाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असा, विश्वास त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
दहावी पास झाल्यानंतर आपल्या आई - वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी मॅकेनिकल इंजिनिअर बनून त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास ३५ टक्के मिळवत 'काठावर पास' झालेल्या विशाल कराड या विद्यार्थ्याने उराशी बाळगला आहे.
विशाल कराडच्या आईला मुलगा दहावी पास झाल्याचा खूप आनंद झाला आहे. विशालची आई म्हटली की, 'माझा मुलगा दहावीमध्ये होता. मी त्याच्याकडून दहावीची परीक्षा पास होण्यासाठी अपेक्षा केली होती. माझा मुलगा पास झाल्याचा खूप आनंद झाला आहे. मी घरातील कामे करून बाहेरची कामे करते. आमची परिस्थिती खूप गरीब आहे. मी दिव्यांग असून बाहेर दोन घरची कामे करते. माझा मुलगा दहावीला पास व्हावा ही खूप इच्छा होती'.
आज दहावीचा निकाल लागला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कोल्हापूरच्या समर्थची चर्चा होत आहे. समर्थ पास झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. समर्थला दहावी पास होणार नाहीस, असं मित्रांनी चिडवले होते. मात्र निकालानंतर 51% गुणांसह समर्थ दहावी पास झाल्याचे समजतात मित्रांनी कोल्हापुरातील गंगावेश ते रंकाळा टॉवर या मार्गावर समर्थची चक्क उंटावरून मिरवणूक काढून आनंद साजरा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.