Maharashtra SSC Result 2023: दहावी निकालाचा टक्का घसरला; काय आहेत वैशिष्ट्ये? वाचा सर्व माहिती एकाच क्लिकवर

SSC Result Update: मागच्या वर्षी दहावीचा निकाल 96.94 टक्के इतका लागला होता.
Maharashtra SSC Result 2023
Maharashtra SSC Result 2023Saam TV

मीनाक्षी गुरव, पुणे

Pune News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) आज दहावीचा निकाल (SSC Result 2023) जाहीर केला. या निकालामध्ये यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. या परीक्षेसाठी 15,29,096 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी फक्त 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागच्या वर्षी दहावीचा निकाल 96.94 टक्के इतका लागला होता. त्या तुलनेत यावर्षीच्या निकालात 3.11 टक्क्यांनी घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra SSC Result 2023
Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल ९३.८३ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी; राज्यात कोकण विभाग अव्वल

यावर्षीच्या दहावीच्या निकालामध्ये 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या निकालामध्ये कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. कोकण विभागातील 98.11 टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. नागपूर विभागाचा 92.05 टक्के इतका निकाल झाला आहे. तर पुणे विभागाचा निकाल 95.64 टक्के इतका लागला आहे.

महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत आज ही माहिती दिली. त्यांनी दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी देखील जाहीर केली. राज्य मंडळातर्फे घेतलेल्या या परीक्षेसाठी 15,41,666 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामधील फक्त 15,29,096 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील 93.83 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल 3.11 टक्क्यांनी घट झाली आहे.

Maharashtra SSC Result 2023
Solapur Pune Highway Accident: सोलापूर- पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; अपघातामुळे वाहतूक ठप्प

सर्व विभागीय मंडळातून 95.87 टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून 92.05 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 3.82 टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात 36,648 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 21,216 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 74.25 टक्के इतकी आहे.

दहवीच्या निकालाची वैशिष्ट्ये -

- 92.49 टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

- परीक्षा माध्यमे - 08

- एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात प्रश्नपत्रिका नेणाऱ्या रनरचे जीपीएस झाले ट्रॅकिंग

Maharashtra SSC Result 2023
Bhandara Crime News: भंडाऱ्यात चाललंय काय? दारुसाठी पैसे दिले नाही, संतप्त मुलाने आईवर केले तलवारीने वार

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी -

विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : 95.64 टक्के

नागपूर : 92.05 टक्के

औरंगाबाद : 93.23 टक्के

मुंबई : 93.66 टक्के

कोल्हापूर : 96.73 टक्के

अमरावती : 93.22 टक्के

नाशिक : 92.22 टक्के

लातूर : 92.67 टक्के

कोकण : 98.11 टक्के

गेल्या काही वर्षातील एकूण निकालाची टक्केवारी :-

वर्ष : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

2023: 93.86 टक्के

2022: 96.94 टक्के

2021: 99.95 टक्के

2020: 95.30 टक्के

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com