IMD Alert: आनंदाची बातमी! राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News: हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
Maharashtra Weather News Rain Alert
Maharashtra Weather News Rain Alert saam tv
Published On: 

Maharashtra Rain Updates: जून महिन्यात राज्यात दाखल झालेल्या पावसाने जुलै महिन्यात चांगलाच धुमाकूळ घातला. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही भागात जरी चांगला पाऊस झाला असला, तरी अद्याप अनेक ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Maharashtra Weather News Rain Alert
Nitin Desai News: नितीन देसाई यांचा मृत्यू कशामुळे झाला? शवविच्छेदन अहवाल आला समोर, सिनेसृष्टीत खळबळ

अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Weather News Rain Alert
Vande Bharat ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; CSMT-शिर्डी, सोलापूर गाड्या आता या स्थानकावर थांबणार

त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने काही भागातील शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. दरम्यान, राज्याच्या ज्या भागात चांगला पाऊस झाला, त्या भागात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तिथं शेती कामांना वेग आला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com