Weather News : राज्यात मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; आजचा हवामानाचा अंदाज काय? वाचा

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात ऑक्टोबरअखेरीसही उष्णता आणि उकाडा कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर व रायगडमध्ये उष्ण-दमट हवामानाचा येलो अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
Maharashtra Weather Update News
Maharashtra Weather Update News AI Image
Published On: 
Summary
  • ऑक्टोबर महिना संपत आला तरी महाराष्ट्रातील अनेक भागांत उष्णता

  • मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे उष्ण व दमट हवामानाचा इशारा

  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस

ऑक्टोबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाही महाराष्ट्रातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळताना दिसत नाही. राज्याच्या विविध भागांत उन्हाचा कडाका आणि वाढलेला उकाडा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला असून, काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather Update News
Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि कोल्हापूर येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः दुपारनंतर वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात.

Maharashtra Weather Update News
Potato Peels : बटाटा सोलून साली फेकून देता? 'असा' करा वापर, ८ दिवसांत दिसेल चमत्कार

राज्याच्या उर्वरित भागात मात्र ढगाळ वातावरण आणि उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या अखेरीसही पावसाळ्यानंतरची उष्णता जाणवत असल्याने नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे उष्णतेचा तडाखा, तर दुसरीकडे काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याने राज्यातील हवामानात संमिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणि पावसाच्या स्थितीत काय बदल होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com