Aditya Thackeray: ठाकरेसेनेचे कार्याध्यक्ष होणार का? आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात विषय संपवला

Aditya Thackeray Role Update Shivsena: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे कार्याध्यक्ष होणआर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षाच्या वर्धापनदिनी ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Aditya Thackeray:  ठाकरेसेनेचे कार्याध्यक्ष होणार का? आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात विषय संपवला
Aditya ThackeraySaam Tv
Published On

Summary -

  • आदित्य ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा

  • पक्ष वर्धापनदिनी मोठी घोषणा होण्याची शक्यता

  • आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बातम्या फेटाळल्या

  • सध्या कोणताही निर्णय किंवा चर्चा नसल्याचे स्पष्ट

ठाकरेसेनेचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे ठाकरेसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आदित्य ठाकरेंना पक्षाकडून १९ जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. २००३ मध्ये ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षात कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती अगदी तशाचप्रकारे आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करून पक्षाची धुरा त्यांच्याकडे देण्यात येईल असे सांगितले जात आहे.

शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलवून तसा रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो. जूनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत एकमताने आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव केला जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना उद्धव ठाकरे यांना जसं कार्याध्यक्ष करण्यात आले तसंच आदित्य ठाकरे यांना देखील कार्याध्यक्ष केलं जाणार आहे. जसं उद्धव ठाकरे यांनी स्वतःची टीम तयार केली होती त्याच पद्धतीने आदित्य ठाकरे स्वतःची टीम तयार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Aditya Thackeray:  ठाकरेसेनेचे कार्याध्यक्ष होणार का? आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात विषय संपवला
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंकडून फिल्डिंग, विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही

पण आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सांगितले की, 'आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही.'

कोण आहेत आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले आमदार आहेत. १३ जून १९९० मध्ये त्यांचा जन्म झाला. आदित्य ठाकरे यांचं माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून शालेय तर सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून पदवीपर्यंतच शिक्षण झालं आहे. तर केसी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. ठाकरे घराणं आणि कला हे एक प्रकारचं रक्ताचं नातं आहे. कलेचा हा वारसा आदित्य यांच्याकडेही आला आहे. आदित्य एक चांगले कवी आणि गीतकार आहेत. त्यांच्या इंग्रजी कवितांचा ‘माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. २०२७ साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचा ‘उम्मीद’ हा गीतांचा अल्बम आला. या अल्बममध्ये त्यांची एकूण ८ गाणी आहेत.

Aditya Thackeray:  ठाकरेसेनेचे कार्याध्यक्ष होणार का? आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात विषय संपवला
Maharashtra Politics: भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप; शिंदेंसमोरच उफाळली शिवसैनिकांची नाराजी, शेवटी खासदार भडकले

आदित्य ठाकरेंचे पहिले आंदोलन -

२०१० मध्ये मुंबई विद्यापीठात शिकत असताना आदित्य यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं. अनिवासी भारतीय रोहिंग्टन मिस्त्री यांच्या ‘सच अ लाँग जर्नी’ या पुस्तकाच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या नेतृत्वातील आंदोलनात या पुस्तकाची होळी करण्यात आली होती. मराठी भाषेबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने हे आंदोलन करण्यात आलं होतं. २०१० हे वर्षे आदित्य यांच्यासाठी ऐतिहासिकच म्हणावं लागेल. २०१० च्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवासेनेची घोषणा केली. यावेळी हजारो लोकांच्या साक्षीने बाळासाहेबांनी आदित्य यांच्या हातात तलवार देत युवासेनेची जबाबदारी सोपवली. सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेला घवघवीत यश मिळवून दिलं.

Aditya Thackeray:  ठाकरेसेनेचे कार्याध्यक्ष होणार का? आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात विषय संपवला
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई

२०१० - युवासेनेच्या अध्यक्षांची नियुक्ती झाली.

२०१७ - मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षांची निवड झाली.

२०१८ - मध्ये शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती झाली.

२०१९ - मध्ये वरळी मतदारसंघाचे आमदार.

२०१९ - महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि शिष्टाचार मंत्री

२०२४ - पुन्हा वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार

Aditya Thackeray:  ठाकरेसेनेचे कार्याध्यक्ष होणार का? आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात विषय संपवला
Maharashtra Politics: डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना घरी बसवा, शिंदेंच्या आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com