Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खरंच फूट पडली का? सुनील तटकरेंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण

Sunil Taktare On Sunetra Pawar: सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत आमचं ट्विनिंग चांगलं आहे. आमच्या पक्षात कोणताही अविश्वास नाही असं स्पष्टपणे सांगितले.
NCP Merger: सुनील तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना नव्हती का? अमोल कोल्हेंनी केला मोठा खुलासा
Amol Kolhe On Sunil Tatkaresaamtv
Published On
  • सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट किंवा अविश्वास नसल्याचा दावा केला

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची प्रत्येक भेट राजकीय नसते असे ते म्हणाले

  • अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम

  • सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षापदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यानंतर मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जयंत पाटील हे देखील होते. या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या बैठकीनंतर सध्या उलटसुलट चर्चा देखील सुरू आहेत. अशामध्ये सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं? हे सांगितले. त्याचसोबत त्यांनी आमच्या पक्षात अविश्वासाचा विषयच नाही असं स्पष्टपणे सांगितले.

सुनील तटकरे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मु्ख्यमंत्री फडणवीसांची भेट, पक्षातील अंतर्गत वादावर सुरू असलेली चर्चा आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वेगवेगल्या मुद्द्यांवर आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, 'आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चा या चुकीच्या आहेत. आमच्या पक्षात अविश्वास नाही. तसंच कुठलाही गैरसमज नाही. जयंत पाटील आणि आमची भेट झाली नाही.'

राष्ट्रावादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल त्यांनी सांगितले की, 'अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या. पण आता विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विलिनीकरणाच्या चर्चा नव्याने सुरू झाल्या नाहीत.' सुनेत्रा पवार यांच्यासोबत आमचं चांगलं ट्विनिंग आहे असे सांगताना ते म्हणाले की, 'सुनेत्रा पवार यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगत असतो. अजितदादांसारखंच ट्युनिंग सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहे. आमच्यात चांगला संवाद होत असतो. ज्या बाबी सांगायच्या त्या आम्ही सांगत असतो.'

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीबाबत सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'फडणवीसांसोबत नेहमी राजकीय भेटी होत असतात. पण मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक भेट राजकीय नसते. जयंत पाटील यांच्यासोबत आमची भेट झाली नाही. आमच्या भेटीचा जयंत पाटील यांच्या भेटीशी संबंध नाही. अनेक विषयांवर मु्ख्यामंत्र्यांसोबत आम्हाला चर्चा करायची आहे. पण सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. यामध्ये अर्थखात्याबाबत देवेंद्र फडवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. '

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com