Maharashtra Politics : 'मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...,' कार्यकर्त्यांनी दिली फोटो फ्रेम भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Bibwewadi activist gifted photo frame to supriya sule : पुण्यात कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना एक फ्रेम भेट केलीय. या फ्रेमवर मुख्यमंत्रि‍पदाचा उल्लेख करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
सुप्रिया सुळे
supriya suleSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? मुख्यंमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. 'मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...,'अशा आशयाची एक फोटो फ्रेम कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना भेट दिलीय. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री...

शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या अश्विनी कदम यांनी सुप्रिया सुळेंना ही फोटोफ्रेम भेट केलेली (Maharashtra Politics) आहे. 'मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की, असा मजकूर या फोटो फ्रेमवर लिहिलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यंमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून देखील रस्सीखेच सुरू आहे. त्यात असा सुप्रिया सुळे याच मुख्यंमंत्री असलेली फोटो फ्रेम समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बदलापूरमधील घटनेचा निषेध शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात केलाय. या अत्याचाराच्या विरुद्ध एक महिलाच न्याय देऊ (sharad pawar) शकते. बदलापूरसारख्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याराचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये संवेदनशील महिला नेतृत्व म्हणून सुप्रिया_सुळे याच मुख्यमंत्री हव्यात, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय. काल अश्विनी कदम यांनी बिबवेवाडी अप्पर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सु्प्रिया सुळेंना (supriya sule) ही फ्रेम सप्रेम भेट दिलीय.

सुप्रिया सुळे
Supriya Sule : माझी पोलीस सुरक्षा तातडीने काढा, खासदार सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती, कारण काय?

विधानसभा निवडणुकीसाठी मविआमध्ये रस्सीखेच?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी कॉंग्रेसच्या जागेवर ठाकरे गट दावा करत आहे. तर कॉंग्रेस आपल्या पारंपारिक मतदारसंघांसाठी आग्रही दिसत (Vidhan sabha election) आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री २.० हे उद्धव ठाकरेच असल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंची मुख्यंमंत्री म्हणून उल्लेख असलेली फोटो फ्रेम समोर आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

सुप्रिया सुळे
BJP Vs Shinde Group: जागावाटपावरून महायुतीत जुंपली? भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com