BJP Vs Shinde Group: जागावाटपावरून महायुतीत जुंपली? भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, पाहा VIDEO

Maharashtra Politics Mahayuti Crisis In Dharashiv : विधानसभा जागावाटपावरुन महायुतीत जुंपली असल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय.

मुंबई : विधानसभा जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत आता धाराशिवमध्ये शिंदे गट विरूद्ध भाजप, असं पाहायला मिळतंय. शिवसेना आमच्या मुळ तीन जागा सोडणार नाही. आमच्या जागा आम्ही कणखरपणे लढणार, असं वक्तव्य आरोग्यमंञी डॉ.तानाजी सावंत यांनी केलंय. त्यामुळे महायुतीमध्ये गोंधळ उडाल्याचं दिसत आहे.

शिवसेना पक्ष म्हणून मी अख्या जिल्ह्यावर दावा सांगणार आहे. माञ, आमच्या ज्या मुळ जागा तीन आहेत, त्यातील एकही जागा आम्ही सोडणार नाही असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंञी डॉ. तानाजी सावंत यांनी केलंय. दरम्यान भाजपकडुन धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघाची जागा भाजपकडे घेण्याची मागणी केली जातेय. याला सावंत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. त्यामुळे महायुतीमध्ये जागेवरुन पुन्हा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com