Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Maharashtra Assembly Election 2024: पुणे शहरात आज शरद पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'
Sharad pawarSaam tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळत आहे. पुण्यात शरद पवारांनी अजित पवार आणि भाजपला मोठा धक्का दिला आहे. वडगाव शेरितील माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकात टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. हडपसरमधील दिलीप तुपे, अनिल तुपे तर खडकवासला येथील भाजपचे समीर धनकवडे यांनी देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान पुण्यात शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात आज शरद पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे, हडपसर मतदारसंघातील संमित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे, वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्या सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'
Maharashtra Politics : 'शपथविधीपूर्वीच्या बैठकीला पवार-अदानींचीही हजेरी'; पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट,VIDEO

पक्ष प्रवेशादरम्यान या सर्वांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असा शब्द या सर्वांनी शरद पवार यांना दिला. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. ऐवढ्या मोठ्या संख्येने शरद पवार गटामध्ये इनकमिंग झाल्यामुळे पुण्यामध्ये भाजपला आणि अजित पवार गटाला हा मोठा धक्का म्हटले जात आहे.

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'
Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप

दरम्यान, वडगाव शेरीतील भाजपच्या माजी नगरसेविकेचा रेखा टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तांनी राष्ट्रवादी काँग्रेश शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला आहे. आधीच अडचणीत सापडलेले आमदार सुनील टिंगरे आणखी बॅकफूटवर आले आहेत. कारण रेखा टिंगरे या वडगाव शेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला खिंडार पडले आहे.

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'
Maharashtra politics : बारामतीची सुभेदारी कोणाकडे? मुलीनंतर नातवासाठी पवारांची फिल्डिंग, उद्विग्न दादांचा काकांना सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com