Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप

Jalana Election : भाजपा नेते रावसाहेब दानवे, महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवे यांचा आरोप
chandrakant danve
chandrakant danvechandrakant danve
Published On

Maharashtra Politics : जालना : जालन्याच्या भोकरदन विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. भाजपा नेते रावसाहेब दानवे, महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केलाय. भोकरदन तालुक्यातील दगडवाडी गावातील कॉर्नर बैठक संपवून परत निघत असताना काही अज्ञातांनी चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर दगड फेकला.

मात्र चंद्रकांत दानवे यांची गाडी पुढे सरकल्याने तो दगड त्यांच्या ताफ्यातील मागे असलेल्या गाडीवर पडला. या घटनेत खांद्याला दगड लागल्याने राजेंद्र दसपुते हे जखमी झालेत. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी योग्य त्या कारवाईची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलीय.

भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवे यांचा आरोप

जालन्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर काल रात्री भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील कॉर्नर बैठक संपवून भोकरदनकडे निघाले असता दगडफेक झाल्याच समोर आल आहे.ही दगडफेक भाजप कार्यकर्ते आणि संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी केला आहे.

पोलीस सुरक्षा देण्यासाठी चंद्रकांत दानवे यांचा भोकरदन पोलिसांना अर्ज

काल रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यावर भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे दगडफेक झाल्याचे समोर आला दरम्यान चंद्रकांत दानवे यांनी भोकरदन पोलिसांना लेखी तक्रार अर्ज सादर केला असून आमच्या ताफ्यावर दगडफेक झाली असल्याच म्हणत आम्हाला पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत दानवे यांनी भोकरदन पोलिसांकडे केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com