Political Breaking News : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाला किती जागा मिळणार?

Mahavikas Aghadi Seat Sharing formula : वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी २ जागा महाविकास आघाडी सोडणार अशीही चर्चा आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSaam Tv
Published On

गिरीश कांबळे | मुंबई

Political News :

लोकसभा जागावाटपासाठी काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाचा बैठका सुरूच आहेत. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात ठरणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. महायुतीत ठाकरे गट मोठा भाऊ असणार, हे जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे.  (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाला २० जागा, काँग्रेसला १८ जागा तर शरद पवार गटाला १० मिळणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना तीन जागा सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavikas Aghadi
Buldhana News: मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

शिवसेना ठाकरे गट २० जागा लढवण्यावर ठाम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ९ ते १० जागा लढवणार आहेत. काँग्रेस पक्ष १५ ते १८ जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी २ जागा महाविकास आघाडी सोडणार अशीही चर्चा आहे. २०-१८-१० या फॉर्मुलावर आतापर्यंत अंतिम चर्चा असल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीबाबत महत्त्वाची बैठक काल पार पडली. जागावाटपाबाबत यापुढे बैठक होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर गेले आहेत. काँग्रेस शिष्टमंडळाची देखील शरद पवारांसोबत बैठक पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित होते.

Mahavikas Aghadi
Buldhana News: मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

महायुतीचंही ठरलं

महायुती इच्छुक उमेदवारांची अदला-बदली करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ साठी NDA ने नवी शक्कल लढवली आहे. पक्षाचे चिन्ह कायम ठेवण्यासाठी घटक पक्षांमध्ये नेते प्रवेश करतील, असं बोललं जात आहे. शिरूरच्या जागेवरून नाराज असलेले आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com