विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला. जोगेश्वरीमध्ये मंगळवारी रात्री मातोश्री क्लबबाहेर दोन्ही गट आमने सामने आहे. या वेळी मारहाण आणि दगडफेक देखील करण्यात आली. या राड्याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले असता १५ ते २० मिनिटं रस्ता जाम झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या गुन्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनिषा वायकरांच्या महिला कार्यकर्त्याच्या गाडीचा पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या राड्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्यामुळे विनयभंगाचा गुन्हा देखील चार ते पाच कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे. या राड्यामध्ये सध्या जोगेश्वरीमध्ये तणावाचे वातावरण आहे. सध्या मातोश्री क्बलबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात मंगळवारी रात्री शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला. जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मातोश्री क्लबमधून दगडफेक झाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांना देखील मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. ड्राय डे असताना मातोश्री क्लबमधील रेस्टॉरंट अँड बारमध्ये ३५० जणांचा जमाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.