Ajit Pawar News : 'वहिनींना पाडलं, आता दादांना पाडायचंय का?' गब्बरच्या 'त्या' पत्रामुळे बारामतीत खळबळ

Gabbar Patra Viral On Social Media NCP Ajit Pawar Group : बारामतीमध्ये सध्या गब्बरचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय. बारामतीकर यांच्या नावाने हे पत्र लिहिलं गेलंय.
अजित पवार
Ajit Pawar NewsSaam Tv
Published On

मंगेश कचरे, साम टीव्ही बारामती

बारामतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान आता बारामतीकरांच्या नावाने लिहिलेलं गब्बरचं पत्र देखील व्हायरल होतंय. या पत्रामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केलेला आहे. या पत्रामुळे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील राजकीय धूसफूस उघड होत आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

बारामतीत गब्बरचं पत्र व्हायरल

सध्या सोशल मीडियावर "गब्बर" या नावाने लिहिलेलं एक पत्र जोरात व्हायरल होत (Maharashtra Politics) आहे. या पत्रामध्ये बारामतीतील राजकीय वातावरणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पत्रात बारामतीच्या नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा यावर सवाल उपस्थित करण्यात आलाय. गब्बरच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पत्रात नेमकं लिहिलंय काय?

या पत्रामध्ये लेखकाने बारामतीकरांनी साहेब (शरद पवार), दादा (अजित पवार), ताई( सुप्रिया सुळे) यांच्यावर नेहमीच प्रेम केल्याचे आणि मतदान रूपी आशीर्वाद दिल्याचे नमूद (Gabbar Patra Viral) केलंय. परंतु, सद्यस्थितीमध्ये बारामतीचे राजकीय वातावरण गढुळ झाल्याचं मत देखील लेखकाने व्यक्त केलंय. स्थानिक नेत्यांच्या स्वप्नांना तडाखा देण्यासाठी दादांची (अजित पवार) बदनामी करून त्यांना राजकीय पायउतार करण्याचा डाव खेळला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पत्रामधून करण्यात (Baramati News) आलाय.

अजित पवार
Ajit Pawar News: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अजित पवारांनी केला मोठा दावा, महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता

पत्रातून केले गंभीर आरोप

पत्रात "गब्बर"ने वहिनींच्या (सुनेत्रा पवार) पराभवाच्या संदर्भात देखील वक्तव्य केलंय. वहिनींच्या पराभवानंतर (NCP Ajit Pawar) आता दादांनाही राजकीय शर्यतीतून बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा दावा पत्रात केलाय. यामध्ये काही स्थानिक नेत्यांचां देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी दादांच्या गळ्यातील ताईत होऊन आर्थिक ताकद आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. प्रचाराच्या नावाखाली जातीयवाद आणि पैसे वाटप केली. यामुळे फसवणूक झाली, असं देखील पत्रात म्हटलं गेलंय. यामुळे अजित पवार गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे. पत्रामुळे मात्र बारामतीत मोठी खळबळ उडालेली आहे.

अजित पवार
Ajit Pawar: 'कुटुंब सोडणं माझी चूक', अजित पवारांची जाहीर कबुली; घर फुटू न देण्याचा पक्षातील नेत्यांना सल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com