Ajit Pawar News: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अजित पवारांनी केला मोठा दावा; म्हणाले...
Mahayuti Meeting Nagpur: Saam Tv

Ajit Pawar News: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अजित पवारांनी केला मोठा दावा, महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता

Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चेहऱ्यावरुन मोठे विधान केले आहे.
Published on

Ajit Pawar On Mahayuti CM Candidate: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? यावरुन वाद रंगताना दिसत आहे. अशातच आता महायुतीमध्येही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'इंडियन एक्सप्रेस'या इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाने हा वाद रंगण्याची शक्यता आहे. काय म्हणालेत नेमकं अजित पवार? वाचा सविस्तर...

काय म्हणाले अजित पवार?

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चेहऱ्यावरुन मोठे विधान केले आहे. महायुतीमध्ये कोणीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. प्रथम बहुमताचा आकडा गाठणे हे राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे मुख्य लक्ष आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचार करता येईल. मात्र मुख्यमंत्री महायुतीचाच होणार हे नक्की, असे अजित पवार म्हणालेत.

महायुतीत पडणार मिठाचा खडा?

एकीकडे एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते करत आहेत. तर भाजपकडूनही सत्ता मिळवण्याचा दावा केला जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या या विधानाने महायुतीमध्य कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. यावर आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे नेते काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar News: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अजित पवारांनी केला मोठा दावा; म्हणाले...
Maharashtra Politics : अजित पवार गटामुळे भाजपला गळती? दादांमुळे आमदारकीची संधी हुकणार? पाहा व्हिडिओ

बारामतीमधून निवडणूक लढणार का?

दरम्यान, यावेळी बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चांवरही अजित पवार यांनी महत्वाचा खुलासा केला. मी निवडणूक लढणार नसल्याचे म्हटले नाही. जयने बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेल्या मागण्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी ही लोकशाही आहे, अशा मागण्या करता येतात आणि मी तिथून सात-आठ वेळा आमदार झालो आहे, असे उत्तर दिले होते. यावरुनच मी लढणार नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र कोण कुठून निवडणूक लढवणार हे पक्ष ठरवणार आहे, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.

Ajit Pawar News: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? अजित पवारांनी केला मोठा दावा; म्हणाले...
Chhatrapati Sambhajinagar: विहिरीत आईचा मृतदेह दिसला, लेकीनेही उडी मारुन आयुष्य संपवलं, काळीज पिळवटून टाकणारी घटना!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com