Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Deputy CM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून त्यांना तंबी दिली. यावेळी त्यांनी दुष्काळी जिल्ह्याचे दौरा करण्याचे आदेश त्यांना दिले.
Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी
Deputy CM Eknath ShindeSaam Tv
Published On: 
  • एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली

  • उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली

  • दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्याचे त्यांनी मंत्र्यांना आदेश दिले

  • शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर नाराज आहेत. त्यांनी तातडीची बैठक बोलावून मंत्र्यांना तंबी दिली. दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. असे असताना शिंदेसेनेच्या मंत्र्यांना आपले मतदारसंघ सोडूशी वाटत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत या मंत्र्यांची बैठक बोलावून त्यांना दुष्काळी जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश दिलेत. शिंदेंनी मंत्र्यांना तंबी दिल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मंत्री जबाबदारी असलेल्या जिल्ह्यांचे दौरे का करत नाही? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केला. ज्या मंत्र्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे त्या मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करण्याच्या सूचना शिंदेंनी यावेळी दिल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहेत? काय मदत अपेक्षित आहेत? येणाऱ्या अडचणी काय आहेत? याचा आराखडा तयार करण्याचे आदेश शिंदेंनी मंत्र्यांना दिले आहेत.

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

जिल्हाप्रमुख आमदार आणि शहरप्रमुखांच्या बैठका घेऊन प्रत्येक गावात पोहचून परिस्थिती जाणून घ्या अशा देखील सूचना शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिल्या आहेत. दुष्काळी जिल्ह्याचा दौरा करून हा अहवाल पुढील १० दिवसांत सादर करून त्यानुसार शिवसेनेकडून मदतीचे नियोजन करून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मदत पाठवण्याचे नियोजन करण्यात यावे असे देखील त्यांनी बैठकीत सांगितले. अनेक मंत्री पालकमंत्रिपदाची जबाबदारी असलेल्या जिल्ह्यात फार सक्रिय नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करायला हवे अशी खंत मंत्र्यांच्या बैठकीत शिंदेंनी व्यक्त केली.

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी
Maharashtra Drought: राज्यात आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यादीत तुमचा तालुका आहे का? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com