
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. पुण्यात काँग्रेसला पुन्हा एखदा मोठा धक्का बसला. पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसचा हात सोडला. ते उद्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सासवडमध्ये पालखी मैदानात येथे सकाळी १० वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. संजय जगताप यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या तिसऱ्या माजी आमदाराने पक्षाला रामराम ठोकला. संग्राम थोपटे, रवींद्र धगेकरांनंतर संजय जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपमध्ये जाणार आहेत. उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सासवडमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. संजय जगताप हे २०१९ ते २०२४ दरम्यान काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील २०१९ ला निवडून आलेले दोन्हीही माजी आमदारांना भाजपमध्ये आपल्या पक्षात घेतले. मागच्या वर्षी पण काही दिवसापूर्वी संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर उद्या संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर काही दिवसांपूर्वी कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसचे ३ माजी आमदारांनी पक्ष सोडला आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये मोठी घोडदौड सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या २०२९ ला बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केल आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश त्यानंतर इंदापूर मधून प्रवीण माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता उद्या माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.त्यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दिशेने भाजपने तयारी सुरू केलेली दिसते.
संजय जगताप यांनी काल सासवडमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. पुरंदर तालुक्यातील गुंजवणी प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प असे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी मार्गी लागण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठी घोडदौड सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या २०२९ ला बारामती लोकसभा मतदारसंघ नक्कीच काबीज केला जाईल. एकीकडे बारामती लोकसभा मतदान संघावर भाजपने लक्ष केंद्रित केलं असलं तरी अजित पवार यांनाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव असल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.