Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, नाराजी उफाळली; सहसंपर्कप्रमुखपद नको म्हणत जिल्हाप्रमुखानं थेट राजीनामा पाठवला

Vasantrao Bhojane Resigns: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बुलडाण्यात मोठा हादरा बसला आहे. ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी सहसंपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
Uddhav Thackeray and Vasantrao Bhojane
Uddhav Thackeray and Buldhana leader Vasantrao Bhojane resignssaam tv
Published On
Summary

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत मतभेद

ठाकरे गटातील वसंतराव भोजने यांचा राजीनामा

जिल्हाप्रमुख पदावरून हटवल्याने नाराजी

संजय जाधव, साम टीव्ही | बुलडाणा

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत एकत्र आल्यानंतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरलेली असली तरी, दुसरीकडं पक्षांतर्गत नाराजी रोखण्यात ठाकरे गटाला अपयश येत आहे. बुलडाण्याचे जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी सहसंपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला असून,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पक्षाला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे.

आगामी काळात राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ऐन पावसाळ्यात पदाधिकारी, नेत्यांच्या राजीनाम्यांचा पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे सर्वच पक्षांनी पक्षात येण्यास इच्छुक असलेल्यांसाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांकडून पक्षप्रवेश सोहळे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यात ठाकरे गटातून इनकमिंगपेक्षा आउटगोइंगच अधिक प्रमाणात सुरू आहे. आता बुलडाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा बसला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात पक्षांतर्गत नाराजी अचानक उफाळून आली आहे. ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनीच पदावरून हटवल्यानंतर नव्याने नेमणूक केलेल्या सहसंपर्क प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताान वसंतराव भोजने यांनी थेट पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली आहे. नव्याने नेमणूक झालेल्या सहसंपर्कप्रमुखपदाचा राजीनामा देताना मी न स्वीकारलेल्या पदाचा राजीनामा देत आहे, असा उल्लेख भोजनेंनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

कोण आहेत वसंतराव भोजने?

वसंतराव भोजने यांनी बुलडाणा जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बळकटी देण्याचे काम केले आहे. १९८६ पासून त्यांनी शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा उपप्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून पक्षात विविध पदे भूषवलेली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला ज्यावेळी फुटीचे ग्रहण लागले त्यावेळी त्यांनी जिल्हा प्रमुख पद सांभाळले होते. तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते. ५ वेळा ते कृषी उत्पन्न बाजार समिती नांदुराचे संचालकपद भूषवले आहे. बुलडाण्याचे डीपीडीसी सदस्यपदी त्यांनी काम केले आहे. दोन वेळा ते खरेदी-विक्री संघ नांदुराचे संचालक होते. हुतात्मा जगदेवराव सूत गिरणी मलकापूरचे संचालकपदही त्यांनी भूषवले आहे.

Uddhav Thackeray and Vasantrao Bhojane
Raj-Uddhav Yuti: विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच; राज ठाकरेंच्या विधानानं युतीचा सस्पेन्स कायम

जिल्हा प्रमुखपदावरून हटवल्याने नाराजी?

ठाकरे गटाने आज, मंगळवारी १५ जुलै रोजी नव्याने नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात वसंतराव भोजने यांच्याकडील बुलडाणा जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्याचा उल्लेख भोजने यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे. जिल्हा प्रमुखपदावरून हटवून त्यांना मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुखपद दिले आहे. पण आपल्याला हे पद नको, असा स्पष्ट उल्लेख भोजने यांनी केला आहे. मी काम करणारा शिवसैनिक असून, मी पदाशिवाय काम करू शकतो. कोणत्याही पक्षात जाणार नसून, शिवसैनिक म्हणूनच काम करेन, असा ठाम निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे. मी सहसंपर्कप्रमुख हे पद स्वीकारत नाही, त्यामुळे या न स्वीकारलेल्या पदाचा मी राजीनामा देत आहे, असेही त्यांनी ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

Uddhav Thackeray and Vasantrao Bhojane
Shashikant Shinde : मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com