
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत मोठं विधान केलंय. मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाहीये, विधान राज ठाकरेंनी केलंय. इगतपुरीतील अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरेंनी हे विधान केलंय. राज ठाकरेंच्या विधानामुळे युती सस्पेन्स अजून कायम आहे.
नाशिकमधील इगतपुरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन दिवशीय शिबीर मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबत हे विधान केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत टाळी देण्यात आलीय. मात्र, मनसेकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे. मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही.
नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेऊ, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहे. मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले. पण युतीसंदर्भात मनसेच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलू नये, असं आदेश राज ठाकरेंनी दिलेत. त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांनीही त्याचपद्धतीचे विधान केलंय. याआधीही एकटे लढलो आहोत, आता पुढे वेळ आली तरी एकटे लढू असं विधान बाळा नांदगावकर यांनी केलंय. दरम्यान युती संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नको ,असं सामना या मूखपत्रातून सांगण्यात आलंय.
मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले. ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे. दिल्ली,महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील. ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना आहे, असंही सामनामध्ये म्हटलंय. आता संभ्रम नको, असं आवाहन रोखठोकद्वारे करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांआधी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवर भाष्य करू नये, असे आदेश दिलेत. राज ठाकरेंच्या या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झालाय. आता राज ठाकरेंनी इगतपुरीमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. युतीचा निर्णय नंतर घेऊ असं राज ठाकरे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.