
नितीन पाटणकर, साम टीव्ही
लाडकी बहीण योजनेवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. एकीकडे विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. दुसरीकडे विरोधकांचे दावे सत्ताधाऱ्यांकडून फेटाळले जात आहेत. या आरोप-प्रत्यारोपात अजित पवारांचीही एन्ट्री झाली आहे. लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असा निर्धार असल्याचा अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या मान महाराष्ट्राचा, सन्मान महाब्रॅंड्स या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत अजित पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले,' लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचा आमचा निर्धार आहे. लाडकी बहीण योजनेसासाठी ४० ते ४५ हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काटकसर देखील करत आहोत'.
'वाढवणला आम्ही नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ करु पाहात आहोत. यामुळे मुंबईला तिसरे विमानतळ मिळेल, असे अजित पवारांनी सांगितलं. हिंदी सक्तीवर बोलताना अजित पवार म्हणाले, 'हिंदी - त्यात वाईट काय आहे? स्पर्धेच्या युगात मुले टिकली पाहिजे, यासाठी ही तिसरी भाषा आहे. मराठी भाषकांना हिंदी शिकणे सोपे जाते'.
'एआयचा वापर केल्याशिवाय पुढील काळात पर्याय राहणार नाही. आधी साक्षर - निरक्षर होते. नंतर संगणक साक्षर आले. आता एआय आले आहे. एआयसाठी ५०० कोटीची तरतूद अर्थ संकल्पात ठेवली आहे. मी उपमुख्यमंत्री असलो तरी, बारामतीला गेल्यावर शेतात एक चक्कर टाकतोच. तसा आपला शेतकरी हुशार आहे. त्याला कळले की एआयमध्ये फायदा तर तो नक्कीच त्याचा स्वीकार करेल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक सोयाबीनची खरेदी यावेळी केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.