कंपन्या बुडाल्य़ा, राजकारण तापलं; चाकणमधून उद्योगांचं स्थलांतर, 36 हजार कंपन्या बंद

Maharashtra Politics: राज्यात हजारो कंपन्यांच्या स्थंलातराच्या निर्णयानं एकच खळबळ माजली, या बातमीनंतर आता महाराष्ट्राच्या आजीमाजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्या प्रतिदाव्यांनी राज्याचं राजकारण मात्र जोरदार तापलंय. पाहा हा एक रिपोर्ट.
36,211 COMPANIES SHUT DOWN IN MAHARASHTRA; SHARAD PAWAR VS FADNAVIS
36,211 COMPANIES SHUT DOWN IN MAHARASHTRA; SHARAD PAWAR VS FADNAVISsaam tv
Published On

चाकणमध्ये खड्ड्यांना वैतागून अनेक उद्योग स्थलांतराच्या तयारीत आहेत. हे कमी होतं की काय केंद्रानं महाराष्ट्रातल्या कंपन्या बंद पडल्याबाबत धक्कादायक आकडेवारी दिल्यानंतर राज्याचं राजकारण तापलंय. यात आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतलीय. या दोन्ही मुद्यांवरून पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी हे महाराष्ट्रासाठी भुषणावह नसल्याचं गंभीर मत मांडलंय. काय म्हटले आहेत पवार ते पाहूयात...

महाराष्ट्रातून उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही'

चाकणमधील 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 2 हजारहून अधिक कामगार कार्यरत आहेत. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारनं या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. मागील 5 वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद झाल्यात. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही.

मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या या पत्राची तातडीनं दखल घेत या आकडेवारीवर आक्षेप घेतलाय. यातल्या नोंदणी झालेल्या तब्बल ७६ टक्के कंपन्या सुरूच झाल्या नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. तर चाकणच्या विषयात लक्ष घातलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

७६ टक्के कंपन्या सुरूच झाल्या नसल्या तरी उरलेल्या २४ टक्के कंपन्यांचा आकडा हा सुमारे ९ हजार आहे. एवढ्या कंपन्या तरी का बंद पडल्या? त्यांच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय झालं? या प्रश्नांचंही उत्तर मिळायला हवं. कारण बेरोजगारी वाढत असताना सुरू असलेली एकही कंपनी बंद पडणं किंवा महाराष्ट्रातून स्थलांतरित होणं महाराष्ट्राला परवडणारं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com