Heatwave Alert : राज्यातून पाऊस गायब, मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Today Update News : महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असून मॉन्सूनच्या परतीचे संकेत दिसत आहेत. मुंबईसह कोकणातील सहा जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Heatwave Yellow Alert News
Maharashtra Heatwave Yellow Alert News AI Image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होऊन अनेक भागांत पावसाची उघडीप

  • राज्यात मॉन्सून परतीच्या मार्गावर

  • मुंबईसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

  • पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून, अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. राज्याच्या काही भागांतून नैऋत्य मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. आज मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना ऑक्टोबर हीट पासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, परतीच्या पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने उकाडा भलताच वाढला आहे. अशातच आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Heatwave Yellow Alert News
Political News : शिंदेंसेनेच्या बड्या नेत्यासह ७ जणांवर गुन्हा, नामांकित हॉस्पिटलच्या संचालकाकडे १२ लाखांची खंडणी मागितली

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांत सध्या पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते; मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Heatwave Yellow Alert News
FASTag New Update : फास्टॅगच्या नियमामध्ये मोठा बदल! 'या' वाहनधारकांना ५ वर्षांपर्यंत टेन्शन नाही, वाचा संपूर्ण माहिती

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक स्थिती निर्माण होत असल्याने राज्यातील पावसाळी वातावरण हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत पावसाने काही भागांना दिलासा दिला असला तरी आता हवामानाचा पॅटर्न बदलताना दिसत आहे. सकाळी आणि रात्री तुलनेने थंड वातावरण, तर दुपारच्या वेळी वाढता उकाडा असा अनुभव काही भागांत येऊ शकतो. दरम्यान, पुढील काही दिवसांत तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बाहेर पडावे, तसेच उष्ण व दमट वातावरणात पुरेसे पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com