Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra Ganeshotsav 2026 Update News : ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने महाराष्ट्र दुमदुमला. मुंबई, पुणे आणि कोकणात गणरायाचे जल्लोषात स्वागत, भव्य मिरवणुका आणि विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
Ganeshotsav 2026 Begins Across Maharashtra
Ganeshotsav 2026 Begins Across MaharashtraSaam tv
Published On
Summary
  • ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने महाराष्ट्रात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात

  • मुंबईतील लालबागचा राजा, चिंतामणी, मुंबईचा राजा यांसह विविध मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली

  • पुण्यात दगडूशेठ गणपतीची मयूर रथातून भव्य मिरवणूक

  • कोकणात पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे स्वागत

सर्वांचे लाडके आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आज राज्यभर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...च्या जयघोषाने शहरांपासून गावागावांपर्यंत भक्तिमय वातावरण दुमदुमून गेले आहे. मुंबईतील गल्ल्यांपासून कोकणातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत बाप्पाच्या आगमनाने आनंद आणि उत्साहाला उधाण आले आहे.

मुंबईत विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सकाळपासूनच गणरायाच्या प्रतिष्ठापनेची लगबग पाहायला मिळाली. लालबागचा राजा, चिंतामणी, मुंबईचा राजा यांसह अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये विधीवत पूजा-अर्चा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या आगमनासाठी सजलेले मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट यामुळे मुंबईचे वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले आहे. ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि बाप्पाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला आहे.

Ganeshotsav 2026 Begins Across Maharashtra
Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

पुण्यातही गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मानाचा आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपतीची मयूर रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडली. त्यानंतर विधीवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Ganeshotsav 2026 Begins Across Maharashtra
Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

दरम्यान, कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असल्याने घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे. कोकणातील परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचे दर्शन घडवणारा हा सर्वात मोठा सण मानला जातो. त्यामुळे कोकणवासीय आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने सज्ज झाले आहेत. कोकणातील काही भागांत आजही पारंपरिक पद्धतीने बाप्पाला डोक्यावर घेऊन वाजत-गाजत घरी आणण्याची प्रथा जपली जाते. हिरव्यागार शेतांच्या बांधावरून, निसर्गाच्या सान्निध्यातून बाप्पाला डोक्यावर घेऊन जाणारे भाविक आणि त्यांच्यासोबत असलेला ढोल-ताशांचा गजर हे दृश्य मन मोहून टाकणारे असते. अशा या भक्ती, परंपरा आणि संस्कृतीच्या संगमातून राज्यभर गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, पुढील दिवसांत बाप्पाच्या भक्तीत संपूर्ण महाराष्ट्र रंगून जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com