Maharashtra Politics: महापालिकेला कोणतेही गणितं करू नका; भाजपच्या दादांचा राष्ट्रवादीला सूचक सल्ला

Chandrakant Patil Comment On PMC Elections: भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी पीएमसी निवडणुकीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सूचक सल्ला दिलाय. नवीन राजकीय रणनीतींचा प्रयोग करू नका असा सल्ला त्यांनी दिलाय. राष्ट्रवादीने सर्व १२८ जागा स्वतंत्रपणे लढवण्याचे संकेत दिल्याने महायुतीत तणाव वाढला आहे.
Chandrakant Patil Comment On PMC Elections:
Chandrakant Patil giving strategic advice to Ajit Pawar’s NCP ahead of the PMC elections.saam tv
Published On
Summary
  • अजित पवार गटाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सर्व जागांवर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत फोडाफोड झाली होती.

  • चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला सल्ला दिलाय.

महापालिका निवडणुकीत अजित पवारांचे राष्ट्रवादीने महायुती म्हणूनच लढावं, त्यांनी नवीन कोणती गणितं करू नये, सूचक सल्ला भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला दिलाय. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सर्व १२८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार अजित पवार गट राष्ट्रवादीनं केलाय. महापालिकेच्या निवडणूकीत स्वतंत्र लढण्याचा विचार करणाऱ्या अजितदादांना सल्ला दिलाय.

राज्यात स्थानिक संस्थेतील नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांदरम्यान मात्र महायुतीत फोडाफोड आणि आरोप प्रत्यारोप झालेत. कुठे भाजप-राष्ट्रवादी तर कुठे भाजप- शिंदे गट, तर कुठे शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आली. यादरम्यान तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रयोग करत अनैसर्गिक यु्त्या आघाड्या केल्या. आता महापालिकेतही असाच काही प्रयोग होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, त्यावरून भाजप आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पाटील यांना एक सूचक सल्ला दिलाय.

Chandrakant Patil Comment On PMC Elections:
BJP Vs Shiv sena: बोर्ड फाडले, एकमेकांना घातल्या लाथा; वरळीत भाजप-ठाकरे सेनेत का झाला राडा?

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस सर्व १२८जागांवर स्वबळावर लढणार आहे. फेबुवारी २०१७ ला हातातून निसटलेली सत्ता आता, आम्ही काबीज करणार आहोत, त्यादृष्टीने आम्ही पूर्ण ताकीदने तयारी करीत आहोत,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले. तर नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजब प्रकार घडला होता. तो म्हणजे कोल्हापूरसह काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकात पाटील यांनी राष्ट्रवादीला सूचक सल्ला दिलाय.

Chandrakant Patil Comment On PMC Elections:
MahaYuti Face Clash: महायुतीत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढावं. नवीन कोणती गणिते करू नयेत, असे बोलणं सुरू आहे. नगरपालिकामध्ये २८४ इतक्या ठिकाणी नगराध्यक्ष ठरवणं, या सर्व प्रकारात गोंधळ झाला. आता महापालिका फक्त ३० आहेत. त्यातील फक्त २८ महानगरपालिकांची निवडणूक होईल. त्यामुळे ही संख्या आता कमी आहे. खालच्या कार्यकर्त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यायला हवं म्हणून युतीचा प्रॉब्लेम झाला. नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तुलनेत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ती आता संख्या कमी होईल. त्यामुळे प्रश्न कमी होतील, असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com