MAHAYUTI FACES RIFT AS BJP AND SHINDE SENA PUSH SOLO STRATEGY
MAHAYUTI FACES RIFT AS BJP AND SHINDE SENA PUSH SOLO STRATEGY

MahaYuti Face Clash: महायुतीत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

MahaYuti Face Clash: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर महायुतीत स्वबळाचे वारे वाहायला लागलेत. त्यामुळे भाजप सेना युती तुटणार का? आणि भाजपचा आत्मविश्वास नेमका का वाढलाय? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून.
Published on

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांमधील संघर्ष टोकाला गेलाय. त्यातच आता भाजप आणि शिंदेसेनेनं स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात केलीय. भाजपनं तर थेट मुंबईत भाजपचाच महापौर, असा नारा दिलाय. त्यामुळे शिंदेसेना अस्वस्थ झालीय. खरंतर नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याची चर्चा रंगलीय. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं मुंबई महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात.

MAHAYUTI FACES RIFT AS BJP AND SHINDE SENA PUSH SOLO STRATEGY
EVM हॅकिंगसाठीच मतमोजणी लांबणीवर'; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

त्यात 6लोकसभा मतदारसंघातून 1800 जण इच्छूक असल्याचं चित्र आहे. त्यामुळे एका वॉर्डात 7-8 जण इच्छूक असल्याने भाजपने स्वबळाच्या हालचाली सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..मात्र राज्यभरात भाजपनं शिंदेसेनेचं टेन्शन वाढवायला सुरुवात केलीय.

संतोष बांगर, शहाजीबापू पाटील यांच्यावर धाडी

सिडको घोटाळा प्रकरणासाठी चौकशी समिती

शिंदेसेनेच्या नेत्यांचे विरोधकांचा भाजप प्रवेश

MAHAYUTI FACES RIFT AS BJP AND SHINDE SENA PUSH SOLO STRATEGY
Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपनं स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले... त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या पक्षांसोबत युती आणि आघाड्या झाल्या. मात्र खरा संघर्ष रंगला तो महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची चर्चाच झाली नाही. आताही भाजप आणि शिंदेसेनेनं दिलेले स्वबळाचे संकेत महाविकास आघाडीवरुन लक्ष हटवण्यासाठी आहेत की ही महायुतीतील नुराकुस्ती असणार आहे.. असा प्रश्न विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com