Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

Sakal Survey: सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केलेल्या कामांबाबत जनतेकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या. महायुती सरकारने सर्वाधिक काम पायाभूत सुविधांवर केलंय.
Sakal Survey:
Survey highlights Devendra Fadnavis-led Mahayuti government as top performer in Maharashtra’s infrastructure development.saam tv
Published On
Summary
  • पायाभूत सुविधांच्या कामगिरीत महायुती सरकार अव्वल ठरलंय.

  • देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पांना मिळालेली गती विशेष ठरली.

  • फडणवीस यांनी इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे काम केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने पायाभूत सुविधांवर भर दिल्याचे निष्कर्ष सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहेत. फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळापासून पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महायुती सरकारने पायाभूत सुविधांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत त्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sakal Survey:
स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केलेल्या कामांबाबत जनतेकडून प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात किती कामे झाली? कोणत्या क्षेत्रात प्रगती झाली? प्रशासन कसं राहिले? कायदा- सुव्यवस्था कशी होती? उद्योग क्षेत्रात किती आणि कसं काम केलं आदी प्रश्न विचारण्यात आले.

Sakal Survey:
Maharashtra Politics : नेत्यांची फोडाफोडी सुरुच! भाजप नेत्याचा शिंदेसेनेवर पलटवार; पक्षप्रवेशावरून महायुतीमध्ये धुसफूस

यात फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारनं बाजी मारलीय. त्यांच्या काळातील महायुती सरकारने सर्वाधिक काम पायाभूत सुविधांवर केलंय. जवळपास ४२.७ टक्के काम महायुती सरकारनं केलंय. तर त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने २४.६ टक्के पायाभूत सुविधांची कामे केली आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वातील आघाडी सरकारच्या काळात १०.३ टक्के पायाभूत सुविधांची कामे झाली आहेत.

सर्वेक्षणातील निष्कर्ष :

>> देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार - ४२. ७ टक्के

>> एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार - २४.६ टक्के

>> उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार - २२.४ टक्के

>> पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार - १०. ३ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com