Maharashtra Politics : नेत्यांची फोडाफोडी सुरुच! भाजप नेत्याचा शिंदेसेनेवर पलटवार; पक्षप्रवेशावरून महायुतीमध्ये धुसफूस
Kalyan Dombivli NewsSaam Tv

Maharashtra Politics : नेत्यांची फोडाफोडी सुरुच! भाजप नेत्याचा शिंदेसेनेवर पलटवार; पक्षप्रवेशावरून महायुतीमध्ये धुसफूस

Maharashtra Political News : भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावरून कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्ष चिघळला असून, आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे. यामुळे महायुतीच्या संबंधांवर ताण निर्माण होण्याची शक्यता.
Published on
Summary
  • पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापले

  • भाजपनेत्याने शिंदेंच्या नेत्याला सुनावले खडेबोल

  • “तिसरी चूक तर प्रत्युत्तर हमखास” भाजपकडून शिंदे गटाला इशारा

  • महायुतीमध्ये तणाव वाढण्याचे संकेत

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशानंतर पेटलेल्या वादाने कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापले असून, पक्षफोडीच्या आरोप-प्रत्यारोपांतून दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेतील टीकेला काही तासांतच भाजपनेही तितक्याच कडवेपणाने जवाबी फटके दिले.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर आमदार राजेश मोरे व उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केलेल्या आरोपांवर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नाही. उलट उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये आमचे पदाधिकारी तुम्ही घेऊन गेला आहात. युती धर्म पाळण्याची जबाबदारी फक्त भाजपचीच आहे का? असा सवाल परब यांनी शिवसेनेला उद्देशून केला.

Maharashtra Politics : नेत्यांची फोडाफोडी सुरुच! भाजप नेत्याचा शिंदेसेनेवर पलटवार; पक्षप्रवेशावरून महायुतीमध्ये धुसफूस
School Student : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुण्यात कडाक्याची थंडी, शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

परब म्हणाले, आम्ही आतापर्यंत युती धर्म पाळला, पहिली चूक आणि दुसरीही चूक दुर्लक्षिली. पण तिसऱ्या चुकीनंतर शांत बसणारी भाजप आता नाही. तुम्ही दगड माराल तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ. आम्ही मैत्रीत पहिला घाव करत नाही; पण गरज पडल्यास प्रत्युत्तर देण्यात भाजप मागे राहणार नाही.

Maharashtra Politics : नेत्यांची फोडाफोडी सुरुच! भाजप नेत्याचा शिंदेसेनेवर पलटवार; पक्षप्रवेशावरून महायुतीमध्ये धुसफूस
Weather Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका! 'या' जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

भाजपने यावेळी संपूर्ण तारखांसह पक्षप्रवेशाच्या घडामोडींचा तपशील मांडत शिवसेनेने आरोप केले तसे चित्र नसल्याचा दावा केला. तुम्ही आमचे पदाधिकारी घेत असताना आम्ही खासदारांचा निषेध करायचा का? असा प्रतिप्रश्नही परब यांनी उपस्थित केला.

Maharashtra Politics : नेत्यांची फोडाफोडी सुरुच! भाजप नेत्याचा शिंदेसेनेवर पलटवार; पक्षप्रवेशावरून महायुतीमध्ये धुसफूस
Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

दरम्यान, आज झालेल्या पक्षप्रवेशाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः फोन करून चौकशी केली असल्याचे नंदू परब यांनी सांगितले. यापुढील सर्व पक्षप्रवेश आपल्या संमतीनेच होतील,असे निर्देशही चव्हाण यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप-शिवसेनेतील हा नवा संघर्ष पाहता महायुतीतील संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com