Maharashtra Government: सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास पहिला दणका शिक्षकांना, CM फडणवीसांचे आदेश

CM Devendra Fadnavis: सामूहिक कॉपी प्रकरणात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Maharashtra Government: सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास पहिला दणका शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना, CM फडणवीसांचे आदेश
CM Devendra FadnavisSaam Tv
Published On

गणेश कवडे, मुंबई

दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे महत्वाचे आदेश दिले.

या बैठकिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री देखील उपस्थित होते. बारावीची परीक्षा आजपासून १८ मार्चपर्यंत कालावधीत ३,३७३ परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Maharashtra Government: सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास पहिला दणका शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना, CM फडणवीसांचे आदेश
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे दिल्लीत, नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार, कोण नमतं घेणार?

कॉपी मुक्त परीक्षेची अंमलबजावणी

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.

विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती होणार

सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठया पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे,संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra Government: सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास पहिला दणका शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना, CM फडणवीसांचे आदेश
Maharashtra Politics : पंकजा मुंडे नवा पक्ष काढणार? छगन भुजबळ म्हणाले काही हरकत नाही

संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर

संवेदनशील परीक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे पूर्णवेळ निगराणी करावी, सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन आणि व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.

Maharashtra Government: सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास पहिला दणका शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना, CM फडणवीसांचे आदेश
Maharashtra Politics: ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं! शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; शरद पवार गटालाही हादरा बसला

कॉपीमुक्त परीक्षेची जबाबदारी

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील, त्यानुसार कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. इंग्रजी भाषा, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षे दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra Government: सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास पहिला दणका शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना, CM फडणवीसांचे आदेश
Maharashtra Politics: मनपा निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com