Deepak Kesarkar: राज्यातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची कवाडे खुली होणार, केसरकरांनी शिष्यवृत्तीविषयी दिली महत्वाची माहिती

scholarship for girl students in maharashtra: आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने २०२४ मध्ये महाराष्ट्रातील १० विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.
scholarship for girl
scholarship for girl Saam tv
Published On

आवेश तांदळे, मुंबई

scholarship for girl students in maharashtra:

राज्यातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी अमेरिकेतील कम्युनिटी कॉलेजने मोठा निर्णय घेतल आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये म्हणून न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने २०२४ मध्ये महाराष्ट्रातील १० विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

शिष्यवृत्तीमुळे राज्यातील १० विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्थित या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. सदर शिष्यवृत्तीच्या रूपाने महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत, असे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

विद्यार्थिनींना ही संधी जर्मनीमधील शैक्षणिक संस्थेतही उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिष्यवृत्तीविषयी ही माहिती दिली. बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी)चे उपाध्यक्ष डॉ. संजय रामदथ, महानगरपालिकेच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी आदी यावेळी उपस्थित होते.

scholarship for girl
Mla disqualification Result Update : शिवसेना MLA अपात्रता निकालावर राहुल नार्वेकर यांना हायकोर्टाची नोटीस, सुनावणीत काय झालं?

परदेशात शिक्षणाची संधी

न्यू यॉर्क (अमेरिका) येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाशी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सामंजस्य करारानुसार ही शिष्यवृत्ती ऑगस्ट २०२४ पासून देण्यात येणार आहे.

या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी मुंबईतील जुहू स्थित नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) येथे संपर्क करावा लागणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी www.bmcc.cuny.edu/apply या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. संजय रामदथ यांनी केले.

scholarship for girl
PM Narendra Modi Maharashtra Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कुणावर निशाणा साधणार?

अशी मिळणार शिष्यवृत्ती

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींचा पहिल्या वर्षासाठीच्या ट्युशन खर्च सदर महाविद्यालय उचलणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींवर कोणताही आर्थिक भार न येता त्यांचे शिक्षण सुरू राहणार आहे. या अभ्यासक्रमादरम्यान शिष्यवृत्तीप्राप्त एकूण दहा विद्यार्थिनींना राहण्याच्या खर्चातही सवलत देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com