Mla disqualification Result Update : शिवसेना MLA अपात्रता निकालावर राहुल नार्वेकर यांना हायकोर्टाची नोटीस, सुनावणीत काय झालं?

Maharashtra Political News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत शिवसेना ( शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली होती.
Bombay High court hearing After Shiv Sena MLA Disqualification Result Latest Update
Bombay High court hearing After Shiv Sena MLA Disqualification Result Latest UpdateSaam Digital
Published On

Mumbai News :

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गटाने आक्षेप नोंदवत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसह शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फरदोश पुनीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आता पुढची सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. (Latest Marathi News)

Bombay High court hearing After Shiv Sena MLA Disqualification Result Latest Update
PM Narendra Modi Maharashtra Tour: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कुणावर निशाणा साधणार?

विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही, असा सवाल उपस्थित करत गोगावले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गट जर खरी शिवसेना आहे तर, व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या ठाकरे गटाच्या १४ आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र करण्याची मागणी गोगावले यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bombay High court hearing After Shiv Sena MLA Disqualification Result Latest Update
Maharashtra Politics: मुंबईत ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लान; शिंदे गटाला फक्त इतक्याच जागा देणार!

ठाकरे गटाचे १४ आमदार कोण?

भरत गोगावले यांनी उदयसिंग राजपूत, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, राजन साळवी, प्रकाश फातर्पेकर, कैलास पाटील, सुनील राऊत, विनायक चौधरी, नितीन देशमुख, सुनील प्रभू, वैभव नाईक, संजय पोतनीस आणि रवींद्र वायकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com