Shiv Sena Vs BJP in Mumbai Lok Sabha 2024
Shiv Sena Vs BJP in Mumbai Lok Sabha 2024 Saam TV

Maharashtra Politics: मुंबईत ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपचा मास्टर प्लान; शिंदे गटाला फक्त इतक्याच जागा देणार!

Mumbai Lok Sabha 2024: मुंबईतील लोकसभेच्या ६ जागा जिंकण्यासाठी आता भाजपने मास्टर प्लान तयार केला आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजप मुंबईत सर्वाधिक जागा लढवणार आहे.
Published on

सूरज मसूरकर, साम टीव्ही मुंबई

Shiv Sena Vs BJP in Mumbai Lok Sabha 2024

आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडून नवनवीन डावपेच आखले जात आहेत. मुंबईतील लोकसभेच्या ६ जागा जिंकण्यासाठी आता भाजपने मास्टर प्लान तयार केला आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजप मुंबईत सर्वाधिक जागा लढवणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena Vs BJP in Mumbai Lok Sabha 2024
Solapur News: सोलापुरात अजितदादांची ताकद वाढली; ४ बड्या नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ

तर शिंदे गटाला (Eknath Shinde) कमी जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी अशी बहुतांश ठिकाणी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून, त्यात मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने मुंबईच्या सहा जागांवर विजय संपादन केला होता. मुंबईत ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) ताकद लक्षात घेता भाजपने खास प्लान आखला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुंबईत सर्वाधिक ४ जागा लढवणार आहे. यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या जागाचाही समावेश आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त दोनच जागा मिळणार असल्याची माहिती आहे.

शिंदे गटाला मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपकडून १२ क्लस्टर तयार करण्यात आल्याचं कळतंय. एका क्लस्टरप्रमुखावर ४ मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यांना ३ ते ४ जागा जिंकून आणण्याचं टार्गेट दिलं गेलं आहे.

Shiv Sena Vs BJP in Mumbai Lok Sabha 2024
Jalgaon Politics: गिरीश महाजनांची किंमत एक रुपयांची; एकनाथ खडसेंनी कोर्टात दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com