Invest In MP: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पुण्यात येणार; राज्यातील प्रकल्प पुन्हा परराज्यात जाणार?

Invest In MP News: महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवण्याचा हा घाट असल्याचा आरोप मविआ नेते करत आहेत. याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Invest In MP News
Invest In MP NewsSaam TV
Published On

Maharashtra Political News: वेदांता फॉक्सकॉनसारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेला. यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका झाली आणि राजकारणही तापलं. महाराष्ट्रातला मोठा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालंय. अशात आता महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी इतर राज्यांनीही जोर लावल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे येत्या शुक्रवारी पुण्यात येणार आहेत. मध्यप्रदेश राज्यात उद्योगधंदे वाढावेत यासाठी ते महाराष्ट्रातील उद्योजकांना त्यांच्या राज्यात म्हणजेच मध्य प्रदेशात येण्याचं आवाहन करणार आहेत. (Business In Maharashtra)

Invest In MP News
Pune Traffic Jam Video: पुणे - सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; अंबादास दानवेंनाही बदलावा लागला मार्ग

Invest In MP ची पुण्यात परिषद

पुण्यातील (Pune) आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुण्यात येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मध्यप्रदेशचे उद्योग मंत्री, आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्री असे सर्वजण Invest In MP या परिषदेला उपस्थित असणार आहेत. यानिमित्ताने आता पुन्हा महाराष्ट्रातील उद्योगाला, गुंतवणुकीसाठी मध्यप्रदेशची दिशा मिळणार का अशी शंका निर्माण झाली आहे. (Session on 'Investment Opportunities in Madhya Pradesh')

मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) गुंतवणूक वाढावी यासाठी मध्यप्रदेश सरकारकडून दरवर्षी या परिषदेचं मध्यप्रदेशमध्ये आयोजन केलं जातं. पण यावर्षी हे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे. ही परिषद झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान महाराष्ट्रातील उद्योगपतींशी वैयक्तिकरित्या चर्चाही करणार आहेत. त्यामध्ये संजय किर्लोसकर, बाबा कल्याणी, आश्विनी मलहोत्रा यांच्यासोबतच इतर अनेक प्रसिद्ध उद्योजकांची नावं आहेत.

उद्योजकांसाठी पुणे हे आवडतं शहर

मुंबईनंतर उद्योजकांना पुणे हे शहर खुणावतं. याचं कारण म्हणजे, पुण्यात किर्लोस्कर, फोक्सवॅगन, टाटा, महिंद्रा, बजाज या ऑटो उद्योगांबरोबरच आयटी क्षेत्रातलेसुद्धा नावाजलेले उद्योग आहेत. आयटीमधील इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा यांसारख्या नावाजलेल्या विविध कंपन्या पुण्यात आहेत. त्याचबरोबर पुण्यात शिक्षण संस्था, पाणी, वीज, रस्ते आणि सुशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता असल्यामुळे पुणे शहर नेहमीच इतर उद्योजकांना गुंतवणुकीसाठी खुणावत असतं. त्यामुळे आता येथील उद्योजकांना मध्यप्रदेशात आपला व्यवसाय स्थापन करण्यासाठी आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांचं स्पष्टीकरण

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योजकांना खुणावत असताना शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवण्याचा हा घाट असल्याचा आरोप मविआ नेते करत आहेत. याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते उद्योजकांशी चर्चा करतायत. त्याचबरोबर डीएमआयसी प्रकल्पाच्या एकूण कामाचा आढावा सुद्धा घेणार आहेत.

यावेळी सामंत म्हणाले की, इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते रोजगार पळवण्यासाठी आले आहेत, असे नाही. वेदांता निघून गेली म्हणून खूप आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, मागील १४ महिन्यांपासून ही बैठक झाली नव्हती. त्यामुळे मी तेच बोलत राहिलो तर काम होणार नाही. देशात नवीन उद्योग येण्यासाठी महाराष्ट्रातील पॉलिसी सर्वात चांगली आहे, मात्र त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन झालं पाहिजे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com