वारंवार भारतावर छुपे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संबंध तोडून टाकले. दोन्ही देशात व्यापार, आयात-निर्यात पूर्णपणे बंद असतांना आपल्या महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये संकष्टीच्या यात्रेत चक्क पाकिस्तानी चादरींची सर्रास विक्री होत असल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.
पिंपरी-चिंचवडमधील श्री मोरया गोसावी मंदिर यात्रेत चक्क 'मेड इन पाकिस्तान' वस्तूंची विक्री होत असल्याचा धक्कादायक खुलासा एका महिलेने केलाय. यात्रेतून खरेदी केलेल्या चादरीवर थेट पाकिस्तानी लेबल आढळल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ माजलीये. ज्या बाजारात ही चादर खुलेआम विकली गेली त्याभागात गेल्या अनेक वर्षांपासून संकष्टीचा बाजार भरतो. भारतात पाकिस्तानी वस्तूंवर कडक निर्बंध असताना ही चादर स्थानिक बाजारात आली कशी? देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडणारा हा चोरटा मार्ग कोणता? असा सवाल उपस्थित झाला या महिलेचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत कारवाईला सुरुवात केलीये.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतची आयात-निर्यात पूर्णपणे थांबवलीये. अगदी अटारी बॉर्डरवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांशी हस्तांदोलनही करत नाहीत, संपूर्ण व्यापार ठप्प आहे. असं असतानाही ही पाकिस्तानी चादर भारतात आली कशी? आज जर चोरट्या मार्गानं भारतात पाकिस्तानची 'चादर' येऊ शकते, तर उद्या त्याच मार्गानं देशात घातपात घडवणारे दहशतवादी आणि शस्त्र कशावरुन येणार नाही हा ही खरा सवालये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.