Mira Road Crime: शरीराचे तुकडे करण्याआधी सानेनं सरस्वतीची हत्या कशी केली?; धक्कादायक माहिती आली समोर

Crime News: त्यामुळे हत्या नेमकी कशी झाली हे शोधनं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं.
Mira Road Crime
Mira Road CrimeSaam TV
Published On: 

Saraswati Case: सरस्वती साने हत्याकांड प्रकरणी दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. सदर घटनेमुळे मुंबई हादरली असून पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. मनोज साने याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. मात्र मी हत्या केलेली नाही असं सानेनं म्हटलं आहे. त्यामुळे हत्या नेमकी कशी झाली हे शोधनं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं. (Crime News)

सानेनंच केली हत्या

अशात आता पोलीस तपासात हत्येचा छडा लागला आहे. घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरात सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केलेलं पोलिसांनी पाहिलं. यावेळी सानेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सरस्वतीने विष घेऊन आत्महत्या केली, मात्र मी पकडला जाईल त्यामुळे तिच्या शरीराचे तुकडे करत होतो, असं सानेनं म्हटलं. परंतु ही हत्या त्यानेच केली असल्याचं पोलिस म्हणत आहेत.

Mira Road Crime
Akola Crime News: बाप नाही तू तर साप! पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

कसं संपवलं सरस्वतीला

सानेच्या चौकशीत पुढे धक्कादायक माहिती समोर आली आहे. सानेनं स्वत:सरस्वतीला विष देऊन तिची हत्या केली आहे. सरस्वतीला त्याने ताकात विष मिसळवून दिलं होतं. ताक पिल्यावर तिचा मृत्यू झाला आहे. मनोज साने याने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीच्या हत्येचा आधिच कट रचला होता.

बोरिवलीतून घेतलं विष

साने गेल्या महिन्याभरापासून सरस्वतीला संपवण्याच्या तयारीत होता. त्याने यासाठी योग्य प्लॅन आखला होता. हत्येच्या काही दिवस आधी त्याने बोरिवली येथील एका दुकानातून किटकनाशक खरेदी केलं होतं. त्याने तेच किटकनाशक सरस्वतीच्या ताकात मिसळलं आहे. सानेनं स्वत: हे किटकनाशक खरेदी केलं होतं. त्यामुळे त्यानेच सरस्वतीला ते पिण्यासाठी दिलं, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Mira Road Crime
Lonavla Crime News: लोणावळा दुहेरी हत्याकांड! तब्बल ३० वर्षांनी आरोपी अटकेत; काय आहे प्रकरण?

तसेच पुढे पोलिसांनी म्हटलं की, सानेच्या घरी जे किटकनाशक सापडले ते सरस्वतीने आणले नव्हते. हे किटकनाशक साने घरी घेऊन आला होता. दुकानदाराने याची माहिती दिली आहे. तसेच सानेची ओळखही पटली आहे. किटकनाशक विकताना प्रत्येक दुकानदार ग्राहकाचे नाव आणि बॅच नंबर याची नोंद करतो. त्यामुळे हे किटकनाशक साने विकत घेण्यासाठी आल्याचा खुलासा झाला आहे.

मनोज साने आणि सरस्वती हे दोघेही साल २०१४ पासून एकत्र राहत होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. साने अश्लील व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेला होता. तसेच त्याने डेटींग अॅपवर अनेक मुलींना फॉलो केले होते. तो त्यांना भेटायचा. यावरून साने आणि सरस्वती या दोघांमध्ये भांडण होत होते. या वादातून मनोज साने याने ४ जून रोजी सरस्वतीला ताकातून औषध देत तिची हत्या केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.